Latest News

शंकरनगर-अकलूज येथे 45 व्या अखिल भारतीय त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेला दिमाखात प्रारंभ ; कुस्तीपटू व प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ यांच्या वतीने शिवतीर्थ आखाडा शंकरनगर येथे 45 वी आखिल भारतीय त्रिमूर्ती व वजनगट कुस्ती स्पर्धेला दिमाखात प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन मदनसिंह मोहिते पाटील व सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते मैदान पूजन करून झाले.

या वेळी सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रीय विजेते राम सारंग, महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर, व्हा. चेअरमन शंकरराव माने देशमुख, रावसाहेब मगर, रामचंद्र सावंत पाटील, महादेव अंधारे,वसंतराव जाधव विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कै. रत्नप्रभादेवी मोहीते-पाटील यांची जन्मशताब्दी, प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहीते पाटील व अकलूज बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहीते-पाटील या बंधुंची अमृत महोत्सवी वर्षाच्या वाटचाली निमित्त दि 29 नोव्हे.ते 1 डिसेंबर पर्यंत सदरच्या स्पर्धा होत आहेत.

स्पर्धेच्या उद्घाटनाची वजन गटातील कुस्ती तुषार जावळे पिलीव विरुद्ध प्रथमेश माने वेळापूर यांच्यात झाली. सदरची कुस्ती मदनसिंह मोहिते पाटील व सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली. यामध्ये कुस्तीत तुषार जावळे विजय झाला.

या स्पर्धेत त्रिमूर्ती केसरीसाठी राष्ट्रीय मल्लांच्या कुस्त्या होणार असून हरियाणाचा मल्ल प्रविण भोला व कोल्हापुर येथील महाराष्ट्र केसरी पृथ्विराज पाटील यांच्यात तर पुणे येथील मल्ल समिर शेख व कंदर येथील मल्ल सतपाल सोनटक्के यांच्यात विशेष कुस्ती होणार आहे. स्पर्धेत दिल्ली, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र येथील राष्ट्रीय स्तरावरील मल्ल सहभागी झाले आहेत.

        ञिमुर्ती केसरीसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षिस दोन लाख, द्वितीय क्रमांकासाठी दिङ लाख, तृतिय एक लाख व चतुर्थ क्रमांकासाठी पन्नास हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आले आहे. तर वजनी गटासाठी स्वतंत्र बक्षिसे असल्याचे सयाजीराजे मोहिते पाटील यांनी सांगितले.

प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरुपाराणी मोहिते पाटील यांनी स्पर्धेचा आढावा घेतला. वजनी गटासाठी 25 ते 85 असे किलो पर्यंत एकूण 15 गट आहेत. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील, सचिव बिभिशन जाधव, सर्व सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!