Latest News

एक टन वजनाचे लोखंडी स्टील चोरीचा नातेपुते पोलिसांनी महिनाभरातच लावला छडा ; चार आरोपींसह तब्बल २,६५,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात 

नातेपुते : महिनाभरापूर्वी पुणे पंढरपूर रोड लगत असलेल्या मांडवे येथील लक्ष्मी सिमेंट पाईप कंपनीमध्ये झालेल्या चोरीचा छडा लावण्यात नातेपुते पोलिसांना यश मिळाले असून चार आरोपीसह त्यांच्याकडून तब्बल २,६५,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत नातेपुते पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये पुणे पंढरपुर रोडलगत मौजे मांडवे, ता. माळशिरस येथे असलेल्या लक्ष्मी सिमेंट पाईप्स कंपनी मधील ६५,०००/- रु. चे ५ MM जाडीचे ०१ टन वजनाचे लोखंडी स्टिल दि. ०७/०८/२०२४ रोजी रात्री १०:०० वा. ते दिनांक ०८/०८/२०२४ रोजीचे सकाळी ०८ वाजण्याचे सुमारास अज्ञात आरोपीने चोरुन नेले. याबाबत किरण केशव कदम रा. कदमवाडी, यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं २९७/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) प्रमाणे दि. ०७/०९/२०२४ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे राकेश लोहार करीत होते.

नातेपुते पोलीस ठाणेचे पोना वाघमोडे यांना गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर गुन्हा करणारे आरोपी मौजे फोंडशिरस, ता. माळशिरस, येथे जंगलामध्ये संशयितरित्या फिरत होते. सहा.पोलीस निरीक्षक महारुद्र परजने यांना माहिती देवुन गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदार यांना तात्काळ रवाना करुन मौजे फोंडशिरस ता. माळशिरस येथे सापळा लावुन ०३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये १) दिपक दादा रणदिवे, २) दिपक रामा रणदिवे, ३) संदिप शामराव रणदिवे सर्व रा. फोंडशिरस, ता. माळशिरस यांना ताब्यात घेवुन अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्यांनी व त्यांचा आणखी ०१ साथिदार  शहारुख उर्फ शेऱ्या रक्मुद्दीन शेख, रा. फोंडशिरस, यांचे मदतीने चोरी केल्याचे कबूल केल्याने त्यांना अटक करून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले ६५,०००/- रु. चे ५ MM जाडीचे ०१ टन वजनाचे लोखंडी स्टिल व गुन्हा करतेवेळी वापरलेली ०२,००,०००/- रु. किंमती TATA ACE कंपनीचे टमटम तिचा आरटीओ नंबर MH-10-AQ-3571 असा एकुण २,६५,०००/- रु मुददेमाल आरोपीच्या ताब्यातुन जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणेचे सहा.पोलीस निरीक्षक महारुद्र परजने, पोहेकॉ राहुल रणनवरे, पोहेको नवनाथ माने, पोना अमोल वाघमोडे, पोना राकेश लोहार, चापोना जावेद अतार, पोकों नितीन पन्नासे, पोकों अस्लम शेख, पोकॉ दिनेश रणनवरे व सायबर पोलीस ठाणेचे पोकों युसुफ पठाण यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!