Latest News

कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या बलात्कार हत्या प्रकरणी देशभर निदर्शने होत असताना माळशिरस तालुका आय एम ए संवेदनशील? 

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात 

अकलूज : कोलकत्ता येथील महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या झाल्या प्रकरणी देशभरातील विविध डॉक्टरांच्या संघटना निषेध व्यक्त करत असताना माळशिरस तालुक्यातील इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी मात्र नॉटरीचेबल असल्याने त्यांची असंवेदनशीलता उघड झाली असल्याची चर्चा सध्या तालुक्यात रंगताना दिसत आहे.कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येप्रकरणी देशभरात डॉक्टर संपावर आहेत. दिल्लीपासून मुंबईपर्यंत डॉक्टरांच्या जवळपास सर्वच मोठ्या संघटना आंदोलन करत आहेत. आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. ती नाईट ड्युटीवर होती.

एका 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या क्रूरतेने संपूर्ण देश हादरला आहे. ही घटना 9 ऑगस्ट रोजी पहाटे 3 ते 5 च्या दरम्यान घडल्याचा अंदाज आहे. पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी दिल्ली-मुंबई आणि इतर ठिकाणचे डॉक्टर आपला निषेध व्यक्त करत आहेत.

याच प्रकरणात माळशिरस तालुक्यातील इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी मात्र असंवेदनशील असलेले पाहायला मिळाले. काल सकाळपासून वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याबाबत तसेच संपाबाबत पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. एका पदाधिकाऱ्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी अजून काही नियोजन नाही आपणास कळवतो म्हणून टाळाटाळ केली. यावरून संबंधित डॉक्टर किती संवेदनशील आहेत याचा प्रत्यय आला. 

काल दिवसभर संबंधित पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर संध्याकाळी रस्त्यावर येऊन निदर्शने करण्याचा दिखावा करण्यात आला असल्याचे काही नागरिकांनी आमच्या प्रतिनिधी जवळ सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!