Latest News

मागील दोन महिन्यातील चोरीच्या घटना उघडकीस आणण्यात अकलूज पोलिसांना यश ; सराईत गुन्हेगारांना जेरबंद करून 1,78,000 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : अकलूज पोलिस ठाण्यात घरफोडी, चैन स्नॅचींग, व फसवणूकीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांना अकलूज पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले असून त्यांच्याकडून तब्बल 1,78,000 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकलूज पलिस ठाणे परिसरात घरफोडी, चोरी, फसवणूक या प्रकारचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत असल्याने वरीष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देवून वेळोवेळी गुन्हे प्रकटीकरण पथकास गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबरोबरच गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

वरीष्ठांच्या सुचनेचे पालन करत पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या सुचनेप्रमाणे शोध घेत असताना पथकातील ए.एस.आय श्रीकांत निकम, पोहेकॉ विक्रम घाटगे, पोहेकॉ शिवकुमार मधभावी, सोमनाथ माने यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

यामध्ये 10 जुलै 2024 रोजी घडलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील अभिमान बापू तुपे वय 50 वर्षे रा.पिटी ता.पाटोदा जि.बीड, विकास विजय जाधव वय 27 वर्षे रा.धसपिंपळगांव ता.पाटोदा जि.बीड यांना सोन्याच्या दागिन्यांच्या बदल्यात सोन्याची बिस्कीटे देतो असे म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 1 सोन्याचे मणीमंगळसुत्र हस्तगत करण्यात आले आहे.

तर दि. 12 जुलै 2024 रोजी संत तुकाराम महाराज पालखी रिंगण सोहळ्याचे वेळी फिर्यादी बाळासाहेब सदाशिव बागाव वय 40 वर्षे रा.वडोली ता.माढा हे दर्शनाकरीता आले असताना त्यांचे गळ्यातील दिड तोळे वजनाची चैन चोरीला गेली होती यातील आरोपी दिपक मच्छिंद्र जाधव वय 30 वर्षे रा.शास्त्रीनगर, नावंडीनाका पेठ बीड याने सदर गुन्हे केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचा शोध घेवून त्याचेकडे विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवून त्याच्याकडून सदरची चैन हस्तगत करण्यात अकलूज पोलिसांना यश मिळाले आहे.

तसेच 08 ऑगस्ट 2024 रोजी फिर्यादी समीर आजाद मनीयार वय 25 वर्षे रा.ब्लडबँकेजवळ अकलूज यांच्या घराचे किचनचा पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून लाकडी दरवाजाचा कोयंडा उचकटून घणामध्ये प्रवेश करून बेडरूमधील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेले होते. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार शुभम परशुराम भोसले वय 18 वर्षे, रोहित उर्फ गोट्या सचिन भोसले वय 18 वर्षे रा.महर्षि कॉलनी अकलूज ता.माळशिरस व दोन अल्पवयीन बालक यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती मिळाल्याने त्यांचा शोध घेवून ते मिळून आल्याने त्यांचेकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करून गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मालापैकी 80,000 रूपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

सदर गुन्ह्यांचा तपास पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगांवकर, पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे, महिला पोलिस उपनिरीक्षक मनिषा महाडीक, पोलिस अंमलदार अमोल बकाल हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!