सीए नितीन कुदळे बेस्ट डिस्ट्रिक्ट डायरेक्टर अवॉर्ड ने सन्मानित ; अकलूज रोटरी क्लबलाही १० पुरस्कार
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : उल्लेखनीय कार्य करून रोटरी क्लब मध्ये नवीन उच्चांक स्थापन केल्याबद्दल सी ए नितीन कुदळे यांना बेस्ट डिस्ट्रिक्ट डायरेक्टर अवार्ड ने सन्मानित करण्यात आले असून अकलूज रोटरी क्लबचाही १० वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ द्वारे पाचगणी येथे रविवार दि ४ ऑगस्ट २०२४ रोजी मागील वर्ष २०२३-२४ मध्ये झालेल्या कार्याचा आढावा घेऊन डिस्ट्रिक्ट अवॉर्ड्स वितरण सोहळा पार पडला. त्यामध्ये रोटरी क्लब अकलूज द्वारे सीएसआर मधून डिस्ट्रिक्ट मधील विविध क्लबच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळामधील मुलींसाठी सायकल प्रोजेक्ट राबविला होता त्यासाठी गर्ल्स एज्युकेशन ट्रॉफी देऊन रोटरी क्लब अकलूज ला सन्मानित करण्यात आला.
तर दि रोटरी फाऊंडेशन हया विभागाचे डायरेक्टर म्हणून सीए नितीन कुदळे यांनी डिस्ट्रिक्ट ३१३२ मध्ये नवीन उच्चांक निर्माण केले त्याची नोंद घेत बेस्ट डिस्ट्रिक्ट डायरेक्टर अवॉर्ड त्यांना देण्यात आला त्याचबरोबर रोटरी क्लब अकलूज ला स्पोर्ट्स, इतर डिस्ट्रिक्ट बरोबर जॉइंट प्रकल्प असे विविध १० अवॉर्ड्स मिळाले.
त्यासाठी रोटरी वर्ष २०१३-२४ चे अध्यक्ष -ओजस दोभाडा, सचिव -कल्पेश पांढरे आणि सर्व रोटरी क्लब अकलूज च्या सदस्यांचे अभिनंदन होत आहे. पाचगणी येथील कार्यक्रमासाठी ओजस दोभाडा, कल्पेश पांढरे, ऍड प्रविण कारंडे, ऍड दिपक फडे, नवनाथ नागणे, सीए. नितीन कुदळे, केतन बोरवके, मनीष गायकवाड, पोपट पाटील, अजित वीर, हनुमंत सुरवसे हे उपस्थित होते.