अतिवेगाने वाहन चालवणे बेतले जीवावर ; रस्त्याच्या कडेच्या संरक्षण पत्र्यास धडकून एकाचा मृत्यू
महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
अकलूज : राज्यभरात अपघातांचे सत्र सुरू असताना देखील वाहन चालक गांभीर्याने घेताना दिसत नाही. अति वेगाने वाहन चालवून झालेल्या अपघातात जीव गमावण्याच्या घटना वारंवार घडत असल्या तरी याचा धडा मात्र कोणी घेताना दिसत नाही. वटपळी तालुका माळशिरस येथे घडलेल्या अशाच घटनेत एक जणाला आपल्या प्राणास मुकावे लागले आहे.
याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 26/07/2024 रोजी सांय. सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सोमनाथ तुकाराम अंकुशराव वय 45 रा.समतानगर अकलूज तालुका माळशिरस व त्यांचा मित्र गणेश काशीनाथ खडतरे रा. मसुदमळा अकलूज असे दोघेजन कचरेवाडी तालुका माळशिरस येथे पाहुण्यांकडे जेवण्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते.
जेवन करुन परत कचरेवाडी येथुन अकलूजकडे येत असताना त्यावेळी रात्री 09/00 वाजले होते. गणेश खडतरे त्याची युनिकॉर्न गाडी चालवत होता व सोमनाथ अंकुशराव मागे बसले होते. गणेश मोटारसायकल वेगाने चालवत असल्याने वटफळी गावचे पुढे कॉर्नर दिसला नसल्याने व मोटारसायकल जोरात असल्याने मोटारसायकल रस्त्याचे कडेला असलेल्या पत्याचे सपोर्ट (संरक्षण पत्रा) यास जावुन आम्ही धडकली व दोघेही खाली रस्त्यावर पडले.
सोमनाथ आल्यावर शुध्दीवर आल्यावर त्याला समजले की त्याचा मित्र गणेश खडतरे ह्यास सरकारी दवाखान्यात नेले असता तो उपचारापुर्वीच मयत झाला आहे. तर सोमनाथ अंकुशराव यांच्या पायास मांडीस डोक्यास, हातास मार लागून ते जखमी झाले आहेत.
याबाबत सोमनाथ तुकाराम अंकुशराव यांनी गणेश काशिनाथ खडतरे यांच्या विरोधात फिर्याद दिल्याने अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 391/2024 भारतीय न्याय संहिता 2023 BNS 106(1), भारतीय न्याय संहिता 2023 BNS 125(a), भारतीय न्याय संहिता 2023 BNS 125(b), भारतीय न्याय संहिता 2023 BNS 281, मोटार वाहन अधिनियम 1988, 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल सुरेश राऊत करीत आहेत.