लवंग प्राथमिक आरोग्य केंद्रावर चोरट्यांचा डल्ला ; दोन कॉम्प्युटरसह 1,55,000 रुपयांच्या साहित्याची चोरी
महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : घर, दुकाने या ठिकाणांबरोबरच वाहनांच्या चोरीच्या घटना घडल्याचे आपण नेहमीच ऐकतो परंतु शासकीय कार्यालयात त्याहूनही प्राथमिक आरोग्य केंद्रात चोरी घडल्याच्या घटनेने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. माळशिरस तालुक्यातील लवंग प्राथमिक आरोग्य केंद्रात चोरी झाल्याची घटना घडली असल्याची फिर्याद अकलूज पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 24/07/2024 रोजी सायंकाळी 6.00 वा. ते दिनांक 25/07/2024 रोजी 08.15 वा. चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने प्राथमिक आरोग्य केंद्र लवंग येथील बंद दरवाजाचे कशानेतरी कुलुप व कोयंडा उचकटून आत प्रवेश करुन 2 संगणक संच व 1 मॉनीटर एकुण 1,55,000/- रुपये किमंतीचा संगणक संच, मॉनीटर साहित्य चोरुन नेले असल्याची फिर्याद मेधा जयसुभाष कदम वय 40 रा.श्रीपुर यांनी दिली आहे.
कदम यांच्या फिर्यादवरून गु. र.नंबर 390/2024, भारतीय न्याय संहिता 2023 बी एन एस 305 (9), भारतीय न्यायसंयता 2023 बी एन एस ३३१(३) भारतीय न्यायसंहिता 2023 बीएनएस 331 (4) प्रमाणे आज्ञा ती व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल शीकतोडे करीत आहेत.