कॅमेरावर मारला काळ्या रंगाचा स्प्रे ; पहाटेच फोडले एटीएम, दोन लाख वीस हजाराची रोकड लंपास
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : अकलूज परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले एटीएम मशीन कापून त्यातून तब्बल दोन लाख वीस हजाराची रोकड चोरून नेली असल्याची घटना घडल्याने सुरक्षे विषयी प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील महावीर पथ येथे हांगे इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर असलेले कॅनरा बँकेचे एटीएम दिनांक 25/7 /2024 रोजी पहाटे ,2/50 ते 3/15 वाजण्याचे सुमारास अनोळखी चोरट्याने सुमो गाडी मधून येऊन अंगावर ब्लॅंकेट पांघरून व चेहरा झाकून सोबत आणलेल्या स्प्रे मधून प्रथम एटीएम मशीनचे कॅमेरावर काळा रंगाचा स्प्रे रंग मारून तसेच एटीएम रूम मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर व बाहेरील बाजूचे सीसीटीव्ही कॅमेरा वर काळे रंगाचा कलर स्प्रे मारून गॅस कटरने एटीएम मशीन कापून एकूण , एटीएम एटीएम मशीन मधील दोन लाख वीस हजार तीनशे रुपये रोख रक्कम चोरून नेलेली आहे.
याबाबत कॅनरा बँक चे व्यवस्थापक अतिश अभिमन्यू देशमुख यांनी अकलूज पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून दिनांक 25/ 7 /2024 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 385/2024 भारतीय न्याय संहिता कलम 305(a), 324(5) प्रमाणे दाखल झालेला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे हे करीत आहेत.