डाळींब उत्पादकांना सोन्याचे दिवस ; अकलूज कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रति किलो 261/- रूपयांचा उच्चांकी दर
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : डाळींब उत्पादक शेतक-यांना अकलूज डाळींब मार्केटमध्ये प्रविण निकम रा.डोंबाळवाडी यांच्या डाळींबाला शिवशंभू फ्रुट कंपनीच्या ज्ञानदेव कुंडलीक कोकरे यांच्या अडत दुकानात प्रति किलो 261 रूपये दर मिळालेने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. काही दिवसापुर्वी उत्तम प्रतिच्या डाळींबीला 100 ते 150 रूपये दर मिळत होता. त्यामुळे डाळींब उत्पादक शेतक-यांना माफक नफा मिळत होता.
अकलूज कृषि उत्पन्न बाजार समितीने परिसरातील शेतक-याची अडचण ओळखून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली डाळींब मार्केटची उभारणी केली. त्यामुळे पंढरपूर, इंदापूर, माढा, सांगोला व माळशिरस तालुक्यातील शेतक-यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.
आपल्या परिसरातील डाळींब वाहतूकीचा मोठा खर्च शेतक-यांना इतर जिल्हातील मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविणेकरीता शेतक-यांना मोठा खर्च करावा लागत होता. परंतू अकलूज बाजार समितीमध्ये डाळींब मार्कट सुरू झाल्याने डाळींब उत्पादक शेतक-यांना त्याचा फायदा होत आहे. रोख पेमेंट, संगणकीय पावती, वाजवी दर तसेच शेतक-यांची फसवणूक होवू नये म्हणून बाजार समितीचे विषेश लक्ष असते. यामूळे अकलूज डाळींब मार्केटवरचा विश्वास दिवसें दिवस वाढत चालला आहे. अकलूज डाळींब मार्केटमध्ये प्रति दिवस सुमारे 4000 ते 4500 हजार क्रेटची आवक सद्या होत आहे. आशी माहिती बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील व सचिव राजेंद्र काकडे यांनी दिली.