Latest News

सोनालीला फोन का करतो? म्हणत घातली डोक्यात बॅट ; एकाचा मृत्यू , चार आरोपी पैकी एकास अटक 

महर्षि डिजीटल न्यूज 

अकलूज : सोनालीला फोन का करतो? असे म्हणत लाकडी बॅट, लाकडी काठी व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना निमगाव पाटी (ता. माळशिरस) परिसरात घडली असून या प्रकरणात चौघांपैकी एकाला अटक करण्यात अकलूज पोलिसांना यश मिळाले आहे.

याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर यल्लाप्पा पवार, अंबादास रामा जाधव व अर्जुन भाऊसाहेब पवार रा.मोरोची (ता. माळशिरस) हे तिघे एच. एफ. डीलक्स एम. एच 45 ए.एस. 1989 या गाडीवरून ट्रिपल सीट वेळापूर येथील नातेवाईकांचा देव देवांचा कार्यक्रम करुन परत मोरोचीकडे जात असताना रात्री 9.45 वा. चे सुमारास निमगांव पाटी विझोरी येथे दगडाचे ढिगा-याजवळ लघवी करीता थांबले तेव्हा आरोपी 1) रामराज अशोक वाघमोडे, 2) रामचंद्र व्यंकू वाघमोडे, 3) सिध्दनाथ रामचंद्र वाघमोडे, 4) बापुराव व्यंकू वाघमोडे सर्व रा. पाण्याचे टाकीजवळ निमगांव पाटी, विझोरी ता. माळशिरस या सर्वांनी मिळून तेथे येवून शंकर पवार यास, सोनालीला फोन का करतो असे म्हणून तुम्हास एका एकाला खल्लास करतो असे म्हणून लाकडी बॅट, लाकडी काठीने लाथाबुक्क्यांनी अंबादास रामा जाधव यास मारहाण करुन जिवेठार मारले.

 तसेच फिर्यादी शंकर यल्लाप्पा पवार, अर्जुन पवार तसेच सोनाली वाघमोडे हिलाही मारहाण करून जखमी केले आहे म्हणून शंकर यल्लाप्पा पवार रा. मोरोची यांच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक बबन साळुंके यांनी गुन्हा रजिस्टर नंबर 382/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 3(5) प्रमाणे दिनांक 23/07/2024 रोजी गुन्हा दाखल केला आहे.  

सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, अकलुज पोलीस ठाणे हे करीत आहेत. सदर गुन्हयातील आरोपी रामराज अशोक वाघमोडे यास अटक करण्यात आली असून दिनांक 26/07/2024 रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!