म्हसवडचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी माण नदीला पाणी सोडून बंधारे भरून घेण्याची खा.धैर्यशील मोहिते पाटील यांची पालकमंत्र्याकडे मागणी
महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
म्हसवड : म्हसवड ता. माण या नगर परिषदेला सध्या ८ दिवसातून एकदा पिण्याचे पाण्याचा पुरवठा केला जात आहे व सध्या वाडीवस्तीसाठी टँकरनी पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे येथील नागरिकांची पाण्यासाठी मोठी वणवण चालू आहे. म्हसवड येथील माण नदीमध्ये उरमोडी प्रकल्पाचे अथवा जिहे कटापुर प्रकल्पाचे पाणी सोडुन बंधारे भरलेस येथील पाणी पातळी वाढलेस विहरी व बोअर चालू होउन पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल. त्यामुळे म्हसवड येथील माण नदीमध्ये पाणी सोडून उरमोडी प्रकल्प अथवा जि-हेकटापुर बंधारे भरणेबाबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पत्र लिहून मागणी केली आहे.
याच बरोबर खटाव तालुक्यातील येरळवाडी मध्यम प्रकल्पाची साठवण क्षमता ही ३२.८० दलघमी असून या प्रकल्पामध्ये सध्या ३३% पाणी साठा उपलब्ध आहे. या प्रकल्पावर ४५ गावांच्या पाणी पुरवठा योजना, औद्योगीक वसाहतीसाठी लागणारे पाणी तसेच लाभक्षेत्रातील शेती सिंचनासाठी लागणारे पाणी प्रकल्प आराखड्यामध्ये सामाविष्ठ आहे.
सध्या लाभक्षेत्रामध्ये पाऊसमान कमी असलेमुळे व धरणातील उपलब्ध पाणी साठा लक्षात घेता भविष्यातील पिण्याच्या पाण्याच्या योजना, औद्योगीकरणासाठी लागणारे पाणी तसेच शेती सिंचनासाठी पाण्याची नितांत गरज भासणार आहे. यासाठी या प्रकल्पामध्ये जिहे कटापूर योजना किंवा उरमोडी प्रकल्पामधून पाणी सोडून येरळवाडी तलाव भरणे अत्यंत गरजेचे आहे.तरी येरळवाडी प्रकल्पात पाणी सोडणेबाबत खासदार मा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे मागणी केली.