शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने प्रौढ शिक्षण प्रचारासाठी ‘वारी साक्षरतेची’ उपक्रम
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने वारी साक्षरतेची या साक्षरता दिंडी चे स्वागत सदाशिवराव माने विद्यालय अकलूज मध्ये मोठ्या उत्साहाने व आनंदाने करण्यात आले.जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोबत आलेल्या लोकांना साक्षरतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यालयामध्ये साक्षरतेचे महत्त्व पटवून देणारी पथनाट्य सादर केले. नवभारत साक्षरतेची रांगोळी काढण्यात आली होती.
अशा वेगवेगळ्या अभिनव पद्धतीने नवभारत साक्षरता दिंडीचे स्वागत करण्यात आले त्यावेळेस माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, शिक्षणाधिकारी सौ. सुलभा वठारे, मुख्याध्यापक अमोल फुले, उपमुख्याध्यापक घंटे सर व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी वारकरी यांचा पोशाख परिधान करून व एनसीसी चे विद्यार्थी एन एस एस चे विद्यार्थी यांनी वारीमध्ये असणार्या लोकांना साक्षरतेचे महत्व पटवून दिले. तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे साक्षरतेचे फलक तयार करून साक्षरते विषयी महत्व पटवून दिले.
वारीमध्ये असणार्या वारकर्यांनीही नवभारत साक्षरता दिंडीमध्ये सहभागी होऊन साक्षरते विषयी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. या साक्षरता अभियानाच्या कार्यक्रमासाठी नवभारत साक्षरता कार्यक्रम शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे स्वयंसेवक रमेश कवितके व लव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.