Latest News

शेअर मार्केट मधून नफा मिळवण्याचे आमिष दाखवून 91 लाखाला फसवले ; अकलूज पोलिसात गुन्हा दाखल

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात 

अकलूज : झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेक जण वेगवेगळ्या प्रकारच्या आमिषाला बळी पडून स्वतःची फसवणूक करून घेण्याच्या घटना वारंवार घडत असतानाही लोक शहाणे होताना दिसत नाहीत. शेअर मार्केटच्या माध्यमातून फसवणूक होण्याच्या प्रकारातही वाढ झाली आहे अशीच एक घटना अकलूज परिसरात घडली असून तब्बल 91 लाखाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्केट मध्ये गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देण्याचे अमित दाखवून 91 लाखाला फसवले असल्याची तक्रार अकलूज पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. आकाश अधिकराव मुंजाळ वय 36 वर्षे धंदा व्यवसाय रा- कृष्णप्रिया नगर यशवंत नगर  ता- माळशिरस जि- सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार  मनोज चंद्रकांत पवार व रूपेश चंद्रकांत पवार दोघे रा- रत्नपुरी 5, संग्राम नगर  ता- माळशिरस यांनी संगणमात  करुन, ‘‘तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक  केली तर तुम्हाला एक  वर्षानंतर दरमहा तुम्ही कोणतविलेल्या रक्कमेपर 10 टक्के नफा मिळेल’’ असा विश्वास देवून गुंतवणूक  करण्यास लावून दिनांक 28/10/2021 ते दिनांक 10/05/2023 या कालावधीत रोख स्वरूपात व आर-टी-जी एस मार्फत वेळावेळी वेगवेगळे बॅंक खात्यामध्ये रक्कम 91,00,000/- रुपये पाठवि.यास सांगून त्याचा नफाही व मुद्दलही दिली नाही म्हणून त्यांनी आर्थिक फसवणूक  केली आहे.

आकाश मुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकलुज पोलीस ठाणे भा-द-वि-सं-क- 406, 420, 34 प्रमाणे गुना  दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक  दिलीप शिंदे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!