अकलूज येथे जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळाचे जिल्हास्तरीय एक दिवसीय शिबीर संपन्न
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : सोलापूर जिल्ह्यातील विरशैव लिंगायत समाजातील सर्व बंधु-भगिनींसाठी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज वितरण संदर्भात जिल्हास्तरीय एक दिवसीय शिबीर शिवशक्ति विरशैव लिंगायत सामाजिक बहूउद्देशिय संस्था अकलूज यांचे वतीने महादेव मंदिर अकलूज ता.माळशिरस येथे संपन्न झाले.
सोलापूर जिल्ह्यातील महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकारी सौ.रजनी लगशेट्टी यांनी कर्ज वितरण पात्रता व अटी संदर्भात उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थितीतांच्या अडचणी समजून घेवून त्यांचे निरसन केले.
यावेळी अकलूचे माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील, अकलूज विरशैव लिंगायत सामाजाचे उपाध्यक्ष संतोष देवशेटे, सदाशिवनगर विरशैव लिंगायत सामाजाचे सागर उरवणे, आप्पा दळवी, चंद्रकांत कुंभार, विठ्ठल बागल, नडगिरे काका, जालिंदर लिगाडे, ओंकार बेलपत्रे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे स्वयंसहायता बचत गटाच्या महिला व सोलापूर जिल्ह्यातील विरशैव लिंगायत समाजबांधव बहूसंख्येने उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष महेश डिकोळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन वैभव स्वामी यांनी केले, तसेच प्रस्ताविक अभिजीत नेंदाणे यांनी करून आभार काशिनाथ उरवणे यांनी मानले.