Latest News

कार्यकर्त्यांची सोबत… जनतेची साथ…माढा विधानसभेच्या लिड मध्ये शिवतेजसिंहांचा हात

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदार संघातून सर्वांना अपेक्षित असलेल्या धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भरघोस मतदांनी विजय मिळवला असला तरी या विजयामध्ये माढा विधानसभा मतदार संघाचा सिंहाचा वाटा असून या मतदार संघाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळणार्‍या शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे या निमित्ताने कौतुक होत आहे.

गेल्या वर्षभरात शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी माढा विधानसभा मतदार संघ पिंजून काढला आहे. तळागाळातील कार्यकर्ते, नागरीकांपासून ते सर्व पक्षीय पदाधिकार्‍यांसोबत त्यांनी आपुलकीचे व स्नेहाचे नाते तयार केले आहे. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी लोकसभा लढवावी यासाठी शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या माध्यमातून या मतदार संघातील सर्वाधिक कार्यकर्त्यांनी आग्रह धरला होता. या आग्रहाला धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि माढा लोकसभेची निवडणूक लढवली.

धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर माढा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आपसुकच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्यावर आली व त्यांनी तब्बल 15 ते 20 दिवस मतदार संघात ठाण मांडून रात्रीचा दिवस करत नेते, कार्यकर्ते व मतदार यांचा योग्य मेळ घालत धैर्यशील मोहिते-पाटील यांना आजवरचे सर्वाधिक म्हणजे तब्बल 52,515 मतांचे लिड मिळवून दिले आहे. त्यांचा मतदार संघातील वावर व सर्वसमावेशक भूमीका यामुळे माढा मतदार संघातील नागरीकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्याची चर्चा या निमित्ताने आता सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे भाजपाच्या उमेदवारा दोन लाखांचे लिड देण्याची भाषा करणार्‍या शिंदे बंधूंचा मोहिते-पाटील घरातील शेंडेफळ असणार्‍या शिवतेजसिंह यांनीच दारून पराभव केल्याचेही आता उघडपणे बोलले जावू लागले आहे. 2014 मध्ये विजयसिंह मोहिते-पाटील यांना 14225 मतांचे लिड होते तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत संजय शिंदे यांना 6505 चे लिड होते. परंतु या वर्षी शिवतेजसिंह यांना माढा विधानसभा मतदार संघाची धुरा आपल्या हाती घेतली आणि तब्बल 52,515 मताधिक्य धैर्यशील मोहिते-पाटील यांना मिळवून दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!