अति वेगाने घेतला दोघांचा बळी ; मध्यरात्रीच्या भीषण अपघाताने अकलूज हादरले
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : शंभर फुटी बायपास रोडवर मध्यरात्री झालेल्या अपघाताने अकलूज चांगलेच हादरले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघेजण अत्यावस्थेत असल्याचे प्राथमिक माहिती अकलूज पोलिसांकडून मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास महर्षि चौक ते जयसिंह चौक रोडवर निसान कंपनीच्या टेरानो या गाडी नं. MH 45 N 0008 या अतिवेगात निघालेल्या चार चाकी वाहनाचा रस्त्याच्या झाडाला धडकून अपघात झाला.
अपघात एवढा भीषण होता की पाठीमागे बसलेल्या एकाचे धड शरीरापासून वेगळे झाले. रक्त बांभाळ दोघांचा जागीच मृत्यू झाला. वाहन चालक आणि त्याच्या शेजारी बसलेला एक जण जखमी झाले असून खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार चालू आहेत तसेच अपघातग्रस्त वेळापूर उघडेवाडी येथील असल्याचे समजते.
मयत झालेल्या दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून अकलूज पोलिसांकडून याबाबत अधिक तपास करण्यात येत असून अद्याप नोंद झालेली नाही.