धैर्यशील मोहिते पाटील खासदार व्हावे म्हणून तब्बल ५३ दिवस चप्पल त्याग केलेल्या महेश लोखंडे यांचा सत्कार
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : आपल्या नेत्या विषयी प्रेम, निष्ठा व केवळ समर्पण च नाही तर जीव लावणारे व जीव देणारे ही कार्यकर्ते आपण आजवर पाहिले आहेत. अशाच एका कार्यकर्त्याने धैर्यशील मोहिते पाटील खासदार व्हावे म्हणून केलेला चप्पल त्याग सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
धैर्यशील मोहिते पाटील खासदार व्हावे अशी मनोमन इच्छा बाळगून असलेल्या धोंडेवाडी ता.पंढरपूर येथील महेश कृष्णा लोखंडे या कार्यकर्त्याने १३ एप्रिल या धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिसानिमित्त चप्पल त्याग केली व ऐन कडक उन्हाळ्यात चक्क ५३ दिवस अनुवानी राहून प्रार्थना केली.
धैर्यशील मोहिते पाटील खासदार म्हणून निवडून आल्या नंतर त्यांचा हा त्याग व समर्पण पाहून शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी लोखंडे यांना नवीन चप्पल व फुल् पोषाक भेट दिली व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश गायकवाड उपस्थित होते.