सहकार महर्षि कारखान्यामध्ये वाहतूक करारांचा स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या हस्ते शुभारंभ ; वाहतूक दरवाढ फरकाची ३४% रक्कम अदा
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये संचालिका स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते कारखाना कार्यस्थळावर गळीत हंगाम २०२४-२५ करीता बैलगाडी, बजाट, ट्रक, ट्रॅक्टर व ऊस तोडणी यंत्र यांचे तोडणी वाहतूक करारांचा शुभारंभ करणेत आला.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.
सहकार महर्षि कारखान्याकडे गत हंगाम २०२३-२४ मध्ये ऊस तोडणी वाहतूकीचे काम केलेल्या वाहन मालक यांचे बँक खातेवर ऊस तोडणी वाहतूकीमध्ये ३४% प्रमाणे झालेल्या दरवाढ फरकाची रक्कम बुधवार दि.२२/०५/२०२४ रोजी वर्ग केली असलेची माहिती कारखान्याच्या संचालिका स्वरूपाराणी जयसिंह मोहिते- पाटील यांनी दिली.
गळीत हंगाम २०२४-२५ करीता बैलगाडी, बजाट, ट्रक, ट्रॅक्टर व ऊस तोडणी यंत्राचे मालक व ठेकेदार यांनी जास्तीत जास्त तोडणी वाहतूकीचे करार करून गाळप हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र केरबा चौगुले यांनी केले.
सदर प्रसंगी बैलगाडी, बजाट, ट्रक, ट्रॅक्टर व ऊस तोडणी यंत्राचे मालक व ठेकेदार तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.