नुकसानग्रस्तांचे सांत्वन करत तात्काळ पंचनामे करून शासकीय मदत देण्याची मागणी ; माढा तालुक्यातील अवकाळीग्रस्त गावांना शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या भेटी
महर्षि डिजीटल न्यूज
माढा : राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने थैमान घातले असतानाच माढा तालुक्यातही अवकाळीचा कहर पहायला मिळाला आहे. याचे गांर्भीय ओळखून युवा नेते शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी तात्काळ अवकाळी ग्रस्त गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्तांचे सांत्वन केले तर संबंधित अधिकार्यांना तात्काळ पंचनामे करून शासकीय मदत मिळवून देण्याची मागणी केली.
मतदान झाल्यानंतर लोकप्रतिनिधी फिरकत नाहीत असा आरोप नेहमीच केला जातो परंतु याला अपवाद ठरवत माढा लोकसभा मतदार संघातील संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचाराची माढा विधानसभा मतदार संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेल्या शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी आज सकाळपासूनच अवकाळीग्रस्त भागाचा दौरा केला. यामध्ये सुरूवातीला लऊळ येथील नुकसान झालेल्या शेतीची, घरांची व व्यवसायीक गाळ्यांची पाहणी केली.
मोडनिंब येथील निखील घोलप यांच्या नर्सरीची, विटभट्टी मजुरांच्या घराच्या नुकसानीची पाहणी तसेच अकोले, फुटजवळगाव व आढेगांव येथे वादळी वारे व अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना दिलासा देऊन तात्काळ योग्य ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या समवेत नवनाथ गोरे, खंडू भोंग, प्रभाकर भोंग, शिवाजी भोंग, सतीश भोंग, प्रकाश चोपडे, देविदास भोंग, राजकुमार नलवडे, महादेव लोखंडे, शिवाजीराजे कांबळे, भाऊ पवार, समाधान अनपट, केशव गायकवाड, सोमनाथ गायकवाड, विक्रम पाटील, आकाश पाटील, वैभव पाटील, राजाभाऊ तोडकर, बंडू सातव, अतुल पाटील, दत्ता नरसाळे, गणेश सोलनकर यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.