Latest News

मतदारांवर दबाव ; भाजप कार्यकर्त्यांवर अचारसंहीता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

महर्षि डिजीटल न्यूज 

अकलूज : ४३ माढा लोकसभा मतदार संघातील, २४५ माढा विधानसभा मतदार संघातील मौजे महाळुंग (भगतवस्ती) येथील बूथ क्र. २९५ मध्ये डॉ. संजय वसंत वाळेकर, विक्रांत आगतराव लाटे आणि राजेंद्र वसंत वाळेकर तिघेही रा. महाळुंग ता. माळशिरस जि. सोलापूर, हे विना परवाना कोणत्याही उमेदवाराचे प्रतिनिधी नसताना, बळजबरीने प्रवेश करून मतदारांवर दबाव आणत होते. 

व भाजप चे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे कमळ चिन्हावर मतदान करण्याचा दबाव आणत होते. या संबंधात माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे  उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांचे महाळुंग बुथ क्र २९५ चे प्रतिनिधी मदन सुभाष भगत यांनी अकलूज पोलीस स्टेशन व निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर अचारसंहीता भंगाचा व फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून मागणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!