श्रीपूर येथे जागा खरेदीच्या कारणावरून किराणा दुकानदारास पंच लाकडी दांडके व सळईने मारहाण

महर्षि डिजीटल न्यूज
श्रीपूर : श्रीपुर तालुका माळशिरस येथे जागा खरेदीच्या कारणावरून किराणा दुकानदारास शिवीगाळ व दमदाटी करून पंच लाकडी दांडगे व सळणे मारहाण करून जबर जखमी केल्याचे घटना घडली आहे.
याबाबत आपले पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार दिनांक 8 एप्रिल रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास शिवाजी चौक श्रीपुर येथील शिंदे किराणा स्टोअर्स चे मालक तानाजी बबन शिंदे वय 46 हे दुकानात बसले असताना जागा खरेदीच्या कारणावरून नागेश पांडुरंग भोसले वय 38, सोमनाथ पांडुरंग भोसले वय 32, अक्षय कांबळे वय 30 व गणेश कांबळे वय 28 यांनी दुकानात शिरून शिवीगाळ व दमदाटी करून जबर मारहाण केली असल्याची फिर्याद तानाजी बबन शिंदे यांनी अकलूज पोलिसात दिली आहे.
शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकलूज पोलिसात भादवी कलम ३२३, ३२४, ३४, ४२७, ५०४, ५०६ कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप एकालाही अटक करण्यात आलेली नाही.