शहर

सारस लव्हाळे याचे IBPS स्पर्धा परीक्षेत यश ; खुल्या गटातून असणाऱ्या २३४ जागेत निवड

महर्षि डिजीटल न्यूज 

अकलूज : अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी चि. सारस रविराज लव्हाळे याने उज्वल यश मिळवत केंद्रीय स्तरावरील IBPSचा (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन) Institute Of Banking Personal Selection स्पर्धा परीक्षेत खुल्या गटातून असणाऱ्या २३४ जागेत निवड झाली.

जवळपास दरवर्षी८ ते १०लाख विद्यार्थी यासाठी प्रयत्न करतात यामध्ये भारतातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या जागा या स्पर्धा परीक्षा द्वारे निवड केल्या जातात.प्री,मेन्स व मुलाखत अश्या पद्धतीने निवड प्रक्रिया असणाऱ्या या स्पर्धेत चि. सारस रविराज लव्हाळे याच्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर पहिल्या प्रयत्नात मिळवल्या गेलेल्या या यशाबद्दल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सह.सा.कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, संचालक कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील व अकलूज ग्रामपंचायत माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले. तसेच चि.सारस याचे लव्हाळे कुटुंबाचे सर्व स्नेही व मित्रपरिवार यांनी कौतुक करून त्याला पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.

चि. सारस ने आपल्या आजोबा राजाभाऊ लव्हाळे यांच्या प्रमाणे बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याचा व भविष्यात शेतीप्रधान अश्या भारतात गरजू शेतकरी वर्गाची सेवा या निमित्ताने करण्याचा मनोदय व्यक्त केला.तसेच संपूर्ण कुटुंब व आजपर्यंत लाभलेले गुरुवर्य यांच्या भक्कम साथसोबत व मार्गदर्शनाखाली या स्पर्धा परीक्षेत मी यश संपादन करू शकलो असे नमूद केले.

पुढे हा अनुभव मी नक्कीच येणाऱ्या काळात माझ्या इतर विद्यार्थ्यांना बंधू-भगिनींना अश्या स्पर्धा परीक्षा साठी उद्युक्त करण्याचा प्रयत्न करीन असे अभिवचन दिले.

या वेळी रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य रवी नलावडे व सर्व प्राध्यापक यांनी या दैदीप्यमान यशाबद्दल त्याचे अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या.अश्या यशस्वी विद्यार्थ्यां मुळे यशाची शिखरे हे महाविद्यालय निश्चितच पादाक्रांत करत राहील हा विश्वास व्यक्त केला.या वेळी आवर्जून चि. सारस चे इयत्ता १ ते ४ चे प्राथमिक शिक्षक दत्तात्र्यय लिके सर उपस्थित होते.

सारस लव्हाळे यांचे इयत्ता छोटा गट ते बारावी पर्यन्त शिक्षण प्रसारक मंडळाचे सदाशिवराव माने विध्यालय प्राथमिक व माध्यमिक शाळेचा विद्यार्थी चि. सारस शिक्षण प्रसारक मंडळाचे रत्नाई कृषी महाविद्यालय येथून बी.एस्सी. कृषी पदवी सन २०२२ उत्तीर्ण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!