शहर

सोलापूर जिल्ह्यातील विकास कामांसाठी 1 कोटी 70 लाखांचा निधी मंजूर ; धैर्यशील मोहिते-पाटील यांची माहिती

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्यातील कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्यामाध्यमातून सन 2023-24 करीता 1 कोटी 70 लाख 23 हजार 839 रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीचे सदस्य धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिली.

मोहिते-पाटील म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 3054 योजनेतून माढ्यातील बिटरगांव ते नाडी रस्ता सुधारणा करणेसाठी 20 लाख रूपये, करमाळ्यातील करमाळा ते भालेवाडी (करंजे) शिंदेवस्ती ते गावठाणपर्यंत रस्ता सुधारणा करणेसाठी 15 लाख, जिंती ते पोमलवाडी रस्ता सुधारणेसाठी 10 लाख, संगम येथील ज्योतीबा मंदिर ते केचेवस्ती ते गणेशगांव शिव ग्रामा 85 रस्ता सुधारणा करणेसाठी 15 लाख, जनसुविधा योजनेमधून माढा तालुक्यातील जाधववाडी येथील बसस्टँड ते मारूती मंदिर रस्ता कॉन्क्रीटीकरण करणेसाठी 8 लाख, वडाचीवाडी बु. येथील माढा शेटफळ रोड ते संतोष कौवलेवस्ती रस्ता कॉन्क्रीटीकरण करणेसाठी 8 लाख, सोलकरवाडी येथील पांढरे ते शेंडगेवस्ती रस्ता खडीकरण करणेसाठी 8 लाख, केवड आश्रमशाळा ते केवड तुर्क पिंपरी शिव रस्ता खडीकरण व मुरमीकरण करणेसाठी 5 लाख,

करमाळा तालुक्यातील बिटरगांव वा. येथील स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी 5 लाख, माळशिरस तालुक्यातील कोंडबावी येथील स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी 5 लाख, पंढरपूर तालुक्यातील नांदुरे येथील सदाशिव यादव घर ते वाघ मळा रस्ता कॉन्क्रीटीकरणासाठी 8 लाख, नागरी सुविधा योजनेतून सांगोला तालुक्यातील महुद बु. येथील सांगोला रोड ते मारूती ढाळेवस्ती रस्ता सुधारणेसाठी 5 लाख, विद्युत विभाग योजनेतून माळशिरस तालुक्यातील बांगार्डे येथील प्रशांत मोहितेवस्ती व मोहन मोहिते वस्तीवर 100 केव्ही डीपी बसविणेसाठी 7 लाख 4 हजार 110 रूपये, फळवणी येथील काळा मळा डीपीला डीशनल डीपी 63 केव्ही बसविणेसाठी 7 लाख 72 हजार 530 रूपये, लवंग येथील किसन वाघ डीपी 100 केव्ही शिफ्ट करणेसाठी 3 लाख 16 हजार 570 रूपये, दहिगांव येथील गांधी डिपीला डीशनल डीपी बसविणेसाठी 7 लाख 63 हजार 320 रूपये, करमाळा तालुक्यातील बिटरगांव येथील कुलदिप पाटील डीपीला डीशनल 63 केव्ही डिपी बसविणेसाठी 6 लाख 42 हजार 823 रूपये, माढा तालुक्यातील अकुंबे येथील गायरान डीपीला गट नं.178 मध्ये डीशनल 100 केव्ही डीपी बसविणेसाठी 7 लाख 97 हजार 686 रूपये व बेंबळे येथील कानापुरीरोड ते अनपटवस्ती व उरंगेवस्ती येथील वाड्यावस्त्यावर भगीरथ डीपी करणेसाठी 18 लाख 26 हजार 820 रूपये असे एकूण 1 कोटी 70 लाख 23 हजार 839 रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!