शिवजयंती निमित्त मराठा व्यावसायिक संघाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन ; 110 जणांचे रक्तदान
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अकलूज मराठा व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ११० जणांनी रक्तदान केले.
विजय चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबीराचे उद्घाटन अकलूज नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले. तर शिबिरास भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट दिली. या वेळी संघाचे अध्यक्ष ॲड.नितीन खराडे, उपाध्यक्ष विशाल गोरे, ज्येष्ठ संचालक डॉ. राजीव राणे, डॉ. सुरेश सुर्यवंशी, नवनाथ सावंत, नितीन देशमुख, उदय शेटे, डॉ.आनंद देशमुख, आदित्य माने, नितेश अंधारे, कृषी पर्यवेक्षक उदय साळुंखे आदी उपस्थित होते.
रक्तदात्यांना जगतगुरु संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भक्ती शक्ती ची मुर्ती संघटनेच्या वतीने भेट देण्यात आली व रक्त पेढी कडून प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी संघाच्या वतीने निराधार व गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गणेश महाडिक, विठ्ठल गायकवाड, इंद्रजित नलवडे, जगदीश कदम, कुंडलिक गायकवाड, दिलीप माने, योगेश देशमुख, विक्रम माने देशमुख यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. धनंजय देशमुख यांनी केले तर आभार ज्येष्ठ संचालक राम चव्हाण यांनी मानले.