ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर अकलूज येथील आईस्क्रीम च्या दुकानाला आग लागून ३६ लाखांचे नुकसान
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर येथील हॉटेल व्हेज ट्रीट नजीकच्या आईस्क्रीम च्या दुकानाला आग लागून तब्बल ३६ लाख सत्तर हजार सातशे रुपयांचे नुकसान झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रतापसिंह चौक येथील गंगा इमेज, ताम्हाणे कॉप्लेक्स येथील सचिन भगवान कदम यांच्या बंद असलेल्या दुकानात लाईटच्या शॉर्टसर्किटमुळे कृष्णा आईसक्रीम अॅन्ड मस्तानी या दुकानाला आज पहाटेच्या सुमारास आग लागल्याची फिर्याद नोंदवण्यात आली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार आगीत कृष्णा आईसक्रीम अॅन्ड मस्तानी या दुकानामधील 17,0000/- रु किमतीचे 200 लिटरचा एक वॉटरकुलर, 5,60,000/- रु किमतीचे डी फ्रिज, एकुण 25000/- रु किमतीचे अँक्या फिल्टर 1 नग, 80,000/- रु किंमतीचे स्टील लेस टेबल 10 नग, 1,33000/- रु किंमतीचे बाकडे 23 नग, 37,000/- रु किंमतीच्या स्टील खुर्चा 12 नग, 1,30,000/-रु कि.चा डि फ्रिज (आईसक्रिम) 1 नग, 3,20,000/-रु कि.चे चिलर मशिन 70 लिटरची 2 नग
1,10,000/- रु किंमतीचे बाँयलर 70 लिटरचा 1 नग, 2,40,000/- रु किमंतीचे आइसक्रिम चरर्नर, 45,000/- रु किंमतीचे ग्लॉस डोअर फ्रिज 1 नग, 70,000/- रु किंमतीचे बांसुदी मशिन 1 नग, 1,40,000/- रु किंमतीचे डी फ्रिज 5 कप्पयाचा 1 नग, 1,20000/- रु किंमतीचे दिड टनाचे दोन AC, 35000/- रु किंमतीचे वॉल फॅन 7 नग, 15,000/- रु किंमतीची पाण्याची टाकी 1000 लिटरची टाकी 200 लिटरच्या दोन टाक्या, 2000/- रु किंमतीचा एझाँस फॅन 1 नग, 57,000/-रु किंमतीचे ग्लॅस पार्टीशन, 70000/-रु किंमतीचे पिओपी, 4,00,000/- रु किंमतीचे फर्निचर, 1,00,000/-रु किंमतीची वायरिंग, 15000/-रु किंमतीचे स्टील रॅक, 40000/-रु किंमतीचे एलईडी टि.व्ही,
1,55,000/-रु किमतीची स्टाईल फर्जी, 22000/-रु किंमतीचे बेसीन, 12000/-रु किंमतीची पाण्याची मोटर 2 नग, 55000/- रु किंमतीचा डिजीटल बोर्ड, 28)7000/- रु किंमतीचा इलेकट्रीक काटा, 25000/-रु किंमतीचे प्लबिंग, 18000/-रु किंमतीचे स्टीलचे ग्लॅस, चमचे, वाट्या, डबे पातीले, भरण्या इत्यादी, 31,000/-रु किमतीचे इन्वटर व बैटरी, 2,50,000/-रु किंमतीचा तयार केलेला पक्का माल, आईसक्रिम, दुध, लस्सी, बासुंदी, पार्सल आईस्क्रीम, कोन आईसक्रिम, 1,40,000/- रु किंमतीचा कच्चा माल (आईसक्रिम पाऊडर दुध पाऊडर, सिरफ, मँगोपल्प इसेन्स व इतर 35) 16,000/- रु रोख रक्कम त्यात 500, 100,50,20,10 रु. नोटा व चिल्लर असे एकुण 36,70,700/- रु चे नुकसान झाल्याचे कळवण्यात आले आहे.
आग विझवण्यासाठी अकलूज नगरपरिषद व स. म. शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाने अथक परिश्रम घेतले. अकलूज पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.



