Latest News

काही झाले तरी आम्ही मोहिते पाटलांसोबत ; माढा लोकसभेसाठी कार्यकर्त्यांचा आग्रह – धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारसंघ काढला पिंजून 

महर्षि डिजीटल न्यूज

महर्षि डिजीटल न्यूज

अकलूज : “सोलापूर जिल्ह्याला पुन्हा विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी मोहिते पाटील परिवाराशिवाय पर्याय नाही…,  काही झाले तरी माढा लोकसभेची निवडणूक धैर्यशील मोहिते पाटील यांनीच लढवावी” गावोगावच्या कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळणाऱ्या या भावना समर्थकांचा उत्साह व जोश वाढवणाऱ्या ठरत आहेत.

सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याच्या समाजकारण व राजकारणात मोहिते-पाटील नावाचे वलय निर्माण केले. तद्नंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी विविध खात्यांचे मंत्रीपद भूषवत असताना विकासात्मक दृष्टिकोनातून जिल्ह्याचा कायापालट केला. तोच वसा आणि वारसा घेऊन आज मोहिते पाटील परिवारातील तिसरी पिढी आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांच्या नेतृत्वाखाली सक्रिय असल्याचे पहायला मिळत आहे. याच तिसऱ्या पिढीतील धडाडीचे नेतृत्व, आधुनिक विचारांची कास धरत नवं- नवीन संकल्पना राबवून  राजकारण व समाजकारण याचा उत्कृष्ट ताळमेळ भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील यांनी घातल्याचे सर्वांनीच पाहिले आहे.

येत्या पंधरा ते वीस दिवसात देशभरातील लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच माढा  लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकेकाळी मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना माढा मतदारसंघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व होते परंतु आता मोहिते पाटील भाजपा मध्ये असल्याने माढा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. याच बालेकिल्ल्यातून मोहिते पाटलांनी निवडून दिलेला सरदार मात्र फितूर झाल्याने मोहिते पाटील समर्थक आक्रमक झाले आहेत. कसल्याही परिस्थितीत पुन्हा तो सरदार निवडून द्यायचा नाही असा विडा या समर्थकांनी उचलल्याचे चित्र सध्या संपूर्ण मतदारसंघात पाहायला मिळत आहे.

त्यामुळे आता या बालेकिल्ल्यात हक्काचा माणूस व आपला माणूस या टॅगलाईन खाली धैर्यशील मोहिते पाटील यांना पुढे करून मोहिते पाटील समर्थक जोरदार कामाला लागले आहेत. विविध क्षेत्रातून सोशल मीडियाच्या माध्यमातून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाच्या प्रतिक्रिया सध्या विविध स्तरातून ऐकावयास मिळत आहेत. मोहिते पाटलांचा राजकीय करिष्मा प्रत्येक निवडणुकीत पाहायला मिळाला आहे. निवडणुकीपूरते राजकारण आणि नंतर समाजकारण अशी एकूण कार्यपद्धती त्यांची राहिली आहे. म्हणूनच धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाचा जोर सध्या वाढताना दिसतो आहे. आणि धैर्यशील मोहिते पाटील हेच जनतेच्या आग्रहास्तव रणमैदानात भाजपाचे उमेदवार असतील आणि ते विक्रमी मतांनी निवडून येतील असा विश्वास मोहिते पाटील समर्थक बोलून दाखवताना दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!