सहकार महर्षि कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चे दोन पुरस्कार ; बेस्ट डिस्टीलरी प्रथम व बेस्ट चिफ् इंजिनिअर पुरस्काराचा समावेश
महर्षि डिजीटल न्युज
अकलूज : सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे यांचे वतीने सन २०२२-२०२३ चे हंगामाकरीता बेस्ट डिस्टीलरी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक माजी केंद्रिय कृषी मंत्री, खा.शरद पवार यांचे शुभहस्ते व माजी उपमख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, तसेच माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे उपस्थितीत संपन्न झाला. पुरस्कार स्विकारणेसाठी कारखान्याच्या संचालिका स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले व डिस्टीलरी मॅनेजर डि.व्ही. रणवरे, कामगार व युनियन प्रतिनिधी तसेच अधिकारी उपस्थित होते.
तसेच कारखान्याचे चिफ इंजिनिअर व फॅक्टरी मॅनेजर सुर्यकांत काशिनाथ गोडसे यांना वैयक्तिक पुरस्कारात बेस्ट चिफ् इंजिनिअर पुरस्कार वरील मान्यवरांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
कारखाना डिस्टीलरी प्रकल्पाची दैनंदिन उत्पादन क्षमता ६० हजार लिटर प्रतिदिन असुन हंगाम २०२२-२०२३ मध्ये ९१.५२ टक्के सरासरी क्षमतेचा वापर, ११.५० टक्के फर्मेटेड वॉशमधील अल्कोहोलचे प्रमाण, ९१.७८ टक्के किण्वन कार्यक्षमता वापरुन, बी हेवी मोलॅसेस पासुन एकुण २३७.९७ लाख लिटर अल्कोहोलचे उत्पादन झाले. सदर प्रकल्पाकडे मागील ३ वर्षात एकुण ४४७.८० लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन होऊन एकूण रु.४०९.४४ प्रति टन अतिरिक्त उत्पादन झाल्यामुळे सभासद व बिगर सभासद यांना एफ.आर.पी. देणे शक्य झाल्याचे चेअरमन जयसिंह मोहिते- पाटील यांनी सांगितले.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते- पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखान्याची वाटचाल प्रगतीपथावर चालू आहे. यापूर्वीही सहकार महर्षि कारखान्यास राष्ट्रीय व राज्य पातळीवरील विविध पुरस्कार मिळाले आहेत तसेच महाराष्ट्र शासनाचा सहकार निष्ठ २०१२ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली.
कारखाना डिस्टीलरीस बेस्ट डिस्टीलरी तसेच चिफ् इंजिनिअर गोडसे यांना वैयक्तीक बेस्ट चिफ् इंजिनिअर प्रथम पुरस्कार सन २०२२-२०२३ चे हंगामाकरीता मिळाल्यामुळे कारखान्याचे कार्यक्षेत्रातील सभासद, ऊस पुरवठादार, कामगार बांधव, व हितचिंतक यांचेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.