शहर

शिवशंकर बझारची दिवाळी बंपर ऑफर; आकर्षक सवलतीतुन होणार ग्राहकांची बचत

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : गेल्या 28 वर्षांपासून ना नफा ना तोटा या तत्वावर ग्राहकांच्या पसंतीच्या अग्रस्थानी असलेल्या शिवशंकर बझार ने दिवाळी सणासाठी बंपर ऑफर सुरु केली असून अनेक आकर्षक सवलती मधून ग्राहकांची 5 ते 50 टक्के पर्यंत मोठी बचत होणार असल्याची माहिती चेअरमन स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांनी दिली.

उद्योगमहर्षी स्व.उदयसिंह मोहिते पाटील यांच्या ध्येय धोरणानुसार शिवशंकर बझार ची यशस्वी वाटचाल सुरु आहे. सहकाराच्या माध्यमातून सुरू असलेले शिवशंकर बझार आज राज्यातील नामांकित बझार म्हणून ओळखले जाते. मुख्य शाखेसह बझारच्या माळशिरस तालुक्यात 9 शाखा कार्यरत आहेत. स्वच्छ, निर्भेळ व माफक दरात ग्राहकांना मालाची विक्री करताना ग्राहकांच्या हिताला बझार ने नेहमीच प्राधान्य दिले आहे. येणार्या दिवळीतही आकर्षक सवलतीची योजना जाहीर केली असून या माध्यमातून ग्राहकांची मोठी बचत होणार आहे.

बझार च्या विविध योजनांची माहिती देताना व्यवस्थापक गोपाळराव माने देशमुख म्हणाले, एकावर एक फ्री योजने अंतर्गत मानसिक अत्तर 6 मिली, टु्र शाईन ग्लास क्‍लिनर 500 मिली, गोवर्धन गुलाबजाम 200 ग्रॅम, मंगलदीप अगरबत्ती सर्व फ्लेवर्स, ट्रु शाईन हॅण्डवॉश 500 मिली, पवित्रा अगरबत्ती सर्व फ्लेवर्स, डाबर गुलाबजाम 175 ग्रॅम, ट्रु शाईन बाथरूम क्‍लिनर 500 मिली, ट्रु शाईन फ्लोअर क्‍लिनर 500 मिली व 1 लि, के.एस.डिओ 150 मिली, ट्रु शाईन किचन डिग्रजर 500 मिली, परफ्युम 25 मिली व 100 मिली, ट्रु शाईन डिश वॉश जेल 500 मिली, ट्रु शाईन टॉयलेट क्‍लिनर 1 लिटर आणि 500 मिली या वस्तू एकावर एक फ्री मिळणार आहेत.

छापील किंमतीवर बंपर डिस्काउंट योजनेत 200 रूपयांचा पारले रस्क 1 किलो 135 रूपयांत, 40 रूपयांचा मोती साबण 35 रूपयांत, 230 रूपयांचा एंगेज डिओ 173 रूपयांत, 250 रूपयांचा पारले 20-20 गोल्ड 1 किलो 138 रूपयांत, 130 रूपयांचा सनफिस्ट मॉमस् मॅजिक 102 रूपयांत, 140 रूपयांचा पारले हॅप्पी चोको चिप्स 85 रूपयांत, 169 रूपयांचा गोदरेज एअर कम फ्रेशनर 105 रूपयांत, 260 रूपयांचे बेडेकर लोणचे 160 रूपयांत, 270 रूपयांचे न्युट्रीरीच डायजेस्टिव्ह विथ मिलेटस् 150 रूपयांत, 150 रूपयांचा सनफिस्ट मारी फॅमिली पॅक 125 रूपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

तसेच सुहाना व रामबंधु चिवडा व चकली मसाल्यावर 15 टक्के, पिळणकर चिवडा मसाला, चकली पीठ, अनारसे पीठ यावर 20 टक्के सुट देण्यात आली आहे. याबरोबरच गायत्री खोबरेल तेल 500 मिली बॉटलवर 1500 मिाली वॉटर बॉटल मोफत देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक गोपाळराव माने-देशमुख यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!