शहर

शिवरत्न पॅटर्नने भरले तिच्या पंखांमध्ये बळ ; डिसीसी बँकेच्या शिपायाची मुलगी होणार डाॅक्टर

महर्षि डिजीटल न्यूज

अकलूज : अकलूज येथील शिवरत्न शिक्षण संस्था संचलित शिवरत्न पॅटर्न मधील शिकत असलेली कु. हर्षाली नामदेव नाईकनवरे ही अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज,सांगली येथे बीए.एम.एस या वैद्यकीय कोर्ससाठी शासकीय कोट्यातून तिला प्रवेश मिळला आहे..

हर्षालीची कौटुंबिक परिस्थिती बेताची आहे तिचे वडील जिल्हा बँकेत शिपाई तर आई दुसऱ्याच्या घरी धुणीभांडी करते मात्र परिस्थितीचा बाऊ न करता डॉक्टर होण्याचे स्वप्न तिने पाहिले. या तीने पाहिलेल्या स्वप्नाला बळ देण्याचे काम शिवरत्न पॅटर्नने केले आहे.

कु.हर्षाली नाईकनवरे ही विद्यार्थिनी दोन वर्षांपूर्वी दहावी मध्ये असताना लक्ष्मीबाई कन्या प्रशालीमध्ये असताना माळशिरस तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी होती.

शिवरत्न पॅर्टनमध्ये तीने प्रवेश घेतल्यानंतर तिची शैक्षणिक प्रगती व घरची आर्थिक परीस्थिती पाहून संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते-पाटील,धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी हर्षालीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारू ११ वी १२ वीची शालेय फी माफ केली होती. तर शिवरत्न पॅटर्न मधील नीट च्या क्लासेस करिता असणारी सर्व फी अकलूज येथील सामाजिक कार्य करणारे सिंहगर्जना ग्रुपने भरली होती.

 कु.हर्षाली नाईकनवरे हिच्या डाॅक्टर होण्याच्या जिद्दीला शिवरत्न पॅटर्नने मार्ग दाखवला ती नीटची परीक्षा उत्तीर्ण झालीअन् तिच्या स्वप्नाने यशाचा मार्ग मोकळा झाला. आता तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!