बिनविरोधची शक्यता मावळली ; दोन जागांवरील उमेदवारांनी माघार न घेतल्याने श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची निवडणुक लागली

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24 ते 2028-29 पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीत दोन जागांवरील उमेदवारांनी माघार न घेतल्याने बिनविरोध होण्याची शक्यता आता मावळली असून दोन जागेसाठी कारखान्याची निवडणुक लागली आहे.
सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीत माळशिरस उत्पादक गटातुन मिलिंद कुलकर्णी, सुरेश पाटील, महादेव शिंदे व गोपाळ गोरे तर इस्लामपूर उत्पादक गटातून बाळासाहेब माने, दत्तात्रय रणवरे, कुमार पाटील, उत्तम बाबर, या दोन गटात निवडणुक लागली आहे.
नातेपुते उत्पादक गटातून मालोजीराव देशमुख, सुधाकर पोळ, प्रफुल्ल कुलकर्णी , फोंडशिरस उत्पादक गटातून सदाशिव वाघमोडे पाटील, शिवाजी गोरे ,रणजीत पाटील , बोरगाव उत्पादक गटातून दत्तात्रय मिसाळ, सचिन लोकरे, बलभीम पाटील, उत्पादक सहकारी संस्था व बिगर उत्पादक सहकारी संस्था,पणन संस्था प्रतिनिधी गटातून आ.रणजितसिंह मोहिते पाटील, अनुसूचित जाती किंवा जमाती प्रतिनिधी गटातून अर्जुन धाईंजे, महिला राखीव प्रतिनिधीमध्ये लीलावती देवकर, लीलावती खराडे, इतर मागासवर्गीय जाती प्रतिनिधी गटातून रामदास कर्णे तर भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी गटातून सुनील माने या 23 उमेदवारांची नावे आता शिल्लक राहिली आहेत.
विरोधी गटातर्फे माळशिरस गटातुन गोपाळ गोरे व इस्लामपूर गटातुन उत्तम बाबर यांचे उमेदवारी अर्ज राहिले आहेत . या दोन विरोधी उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे न घेतल्याने या कारखान्याची निवडणुक लागली आहे. या कारखान्याच्या संचालक मंडळासाठी दि . 25 फेब्रूवारी रोजी मतदान घेण्यात येणार असून दि. 26 रोजी मतमोजणी होवून निकाल जाहिर केला जाईल.