सोलापूर जिल्ह्यातून प्रत्येक गावातील माती जाणार दिल्लीला ; “स्वच्छता ही सेवा “व “मेरी मिट्टी मेरा देश ‘ महोत्सवांतर्गत उपक्रम
महर्षि डिजीटल न्यूज
सोलापूर : “आझादी का अमृत महोत्सव”स्वच्छता हू सेवा व ‘मेरी माटी, मेरा देश’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील एक हजार २५ ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी (दि. २६) अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायती मधील माती दिल्लीला पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत कलशची मोहिमेचे नियोजन करणेत आले आहे.
माझी वसुंधरा अभियान, आझादी का अमृत महोत्सव, मेरी माटी मेरा देश, स्वच्छता या सेवा उपक्रमांची अंमलबजावणी अमृतकलश यात्रेत करण्यात येणार आहे. अमृतकलश यात्रेतून जिल्ह्यातील 1 हजार 25 ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता संदेश, घोषवाक्ये, जलप्रदूषण, ओला व सुका कचऱ्यासाठी कचराकुंडी ठेवणे, अमृत कलशसाठी प्रत्येक घरातून माती संकलन करणे, पंचप्राण शपथ, स्वच्छता शपथ, माझी वसुंधरा शपथ, कचरा गोळा करणे असे विविध उपक्रम राबवून कलश मिरवणूक काढण्यात येणार आहे. या कलशमधून प्रत्येक गावातील माती जिल्हास्तरावर संकलित केली जाणार आहे. ही माती एकत्रित करून एका कलशमध्ये भरून मंत्रालयात पाठविण्यात येणार आहे.
त्यानंतर मुंबई मंत्रालयातून ही माती दिल्लीला पाठवली जाणार आहे. दिल्ली येथे उभारण्यात येणाऱ्या अमृत कलशमध्ये ही माती मिसळली जाणार आहे. या उपक्रमासाठी केंद्र शासनाने देशभरातील प्रत्येक गावातून माती संकलन करण्याचे काम सुरू केले आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावातील माती मिसळली जाणार आहे. यासाठी गाव तालुका व जिल्हास्तरावर कामाचे नियोजन करण्यात आले आहे. मेरी माटी, मेरा देश या उपक्रमाअंतर्गत अमृत कलशसाठी माती संकलन करण्याचे नियोजन वेगळ्या पद्धतीने करण्यात आले आहे.
२६ सप्टेंबर रोजी हा उपक्रम जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायती मध्ये होणार आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत स्वच्छता ही सेवा, आझादी का अमृत महोत्सव, माझी वसुंधरा या तीन ही उपक्रमांचे शपथ दिले जाणार आहेत.
सहभागी होणाऱ्या व्यक्ती,उपक्रम यांचे गावनिहाय माहिती संकलित करणेत आली आहे. गाव निहाय नेमल्या जाणाऱ्या संपर्क अधिकारी नेमणेत आले आहेत. माझी वसुंधरा शपथ व पाणी बचत उपाययोजना यांची माहिती या दिवशी दिली जाणार आहे. एक दिवस माझे गावांसाठी असा बा उपक्रम असून सकाळी ८ वाजले पासून या उपक्रमास सुरूवात होते आहेत.
घराघरातून माती संकलित करणे व पर्यावरण विषयक जनजागृती करणे व स्वछता ही सेवा बाबत ओला सुका कचरा याकरीता घरगुती स्तरावर डस्टबीन चे वाटप करणे साठी नियोजन करणेत आले आहे. गावातील बचत गट ,गणेश मंडळे, nss पथक ,ncc ,नेहरू युवा मंडळ यांना उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी होणे आवाहन करणेत येत आहे. सकाळी प्रभात फेरी काढणे, स्वच्छता ही सेवा अंतर्गत एकत्रित संकलित प्लास्टिक केलेले प्लास्टिक वजन करणे, प्रमुख स्थळांची यादी करून स्वछता करणे पूर्वी व स्वच्छते नंतर फोटो काढून केंद्र शासनाचे संकेतस्थळावर अपलोड करणेत येणार आहे. गावातील माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांचा सहभाग घेणेत येणार आहे.गावात मिरवणुकी तयारी करणेत येत असून सफाई कर्मचारी यांचा देखील गौरव करणेत येत आहे. जिल्हा स्तरावरून संपर्क प्रमुख नियुक्ती करणेत आले आहेत.माझी वसुंधरा अंतर्गत घनकचरा व सांडपाणी विषयक उपक्रम आणि पाणी बचतीचे उपाययोजना जागृती यावर भर द्यावा असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी केले आहे.
माती संकलन केले नंतर तालुकास्तरवर कलश आणणे बाबत नियोजन करणेत येत असल्याचेफप मुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांनी सांगितले
माझी वसुंधराला गती…
माझी वसुंधरा उपक्रमात दक्षिण सोलापुरातील मंद्रूप ग्रामपंचायतीने सलग दोन वर्ष कोटीचे बक्षीस मिळवले आहे. जिल्ह्यात यंदाही या स्पर्धेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सुमारे 25 ग्रामपंचायतीने या स्पर्धेत भाग घेतला आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांनी दिली.