Latest News

अकलूजच्या विकासासाठी शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची पुढाकाराची भूमिका ; ओढा स्वच्छता आणि विकली मार्केट कामांची पाहणी

महर्षि डिजीटल न्यूज 

अकलूज : सोलापूर जिल्ह्याचे युवा नेते व अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी अकलूजच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेली पुढाकाराची भूमिका पुन्हा एकदा दिसून आली. नमामी चंद्रभागा योजने अंतर्गत महाराणा प्रतापसिंह चौक ते गांधी चौक ओढ्याचे स्वच्छता, खोलीकरण, रुंदीकरण व सौंदर्यकरण कामे सध्या वेगात सुरू असून, या कामांची त्यांनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.

स्थानिक पातळीवर या योजनेमुळे ओढ्याच्या सौंदर्याला नवे आयाम मिळत असून, शिवतेजसिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधत कामाच्या गुणवत्ता व वेळेत पूर्णतेसाठी आवश्यक सूचना दिल्या. ओढा स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी त्यांनी नागरिकांनी देखील पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

याचबरोबर, नगर रचना विकास योजने अंतर्गत नवीन बाजारतळ येथे उभारल्या जाणाऱ्या विकली मार्केटच्या कामाचीही त्यांनी तितक्याच बारकाईने पाहणी केली. या वेळी नगरअभियंता धोंडीराम भगनुरे, इंजि.नितीन काकडे, यांच्यासह नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी व स्थानिक लोकप्रतिनिधी तुकाराम टिंगरे यांची उपस्थिती लाभली.

शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या या सातत्यपूर्ण भेटी आणि विकास कामांत सक्रिय सहभागामुळे अकलूजच्या नागरी जीवनमानात सकारात्मक बदल घडत आहेत. त्यांचा हा विकासाभिमुख दृष्टिकोन आणि कामाच्या प्रति असलेली तळमळ निश्चितच अनुकरणीय आहे. अकलूजच्या प्रगतीचा वेग कायम राखण्यासाठी शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची भूमिका निश्चितच लक्षणीय ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!