शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 500 किलोचा हार आणि 25 किलोचा केक ; स्वराज्य प्रतिष्ठान व राजे ग्रुप ने वेधले लक्ष

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : स्वराज्य प्रतिष्ठान व राजे ग्रुप यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्याचे युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. 500 किलोचा भव्य हार क्रेनद्वारे घालून विशेषतः 25 किलोचा केक कापून शिवतेजसिंह मोहिते पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
शिवतेजसिंह यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी शिव कीर्ती बंगला येथे मोठी गर्दी केली होती. स्वराज्य प्रतिष्ठान व राजे ग्रुप च्या वतीने शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे स्वागत हलग्यांचा कडकडाट आणि फटाक्यांच्या आतषबाजीत डी जे लावून करण्यात आले. अनेक मान्यवर आणि ग्रामस्थांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ.स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील, देवन्या मोहिते पाटील, प्रतिष्ठान व ग्रुपचे सर्व पदाधिकारी सदस्य यांच्यासह श्रीपुर महाळूंग परिसरातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
वाढदिवस फक्त आनंदोत्सवापुरता मर्यादित न ठेवता, समाजोपयोगी उपक्रमांवर भर देण्यात आला. स्वराज्य प्रतिष्ठान व राजे ग्रुपच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या आणि वृक्षारोपण मोहिम हाती घेण्यात आली.
यावेळी बोलताना शिवतेजसिंह मोहिते पाटील म्हणाले, “कार्यकर्ते हीच माझी खरी ताकद आहे. तुमच्या प्रेमामुळेच हा दिवस माझ्यासाठी खास असतो. सामाजिक भान ठेवून सर्वांनी पुढे यावे आणि समाजहिताचे कार्य करावे.”
या अनोख्या वाढदिवस शुभेच्छाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.