शहर

राजकुमार हिवरकर पाटील पाटील यांच्या प्रयत्नांना यश ; नातेपुते येथे शंभर खाटांचे महिला हॉस्पिटला मंजूरी

महर्षि डिजीटल न्यूज

नातेपुते : नातेपुते रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलत असून आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी राजकुमार हिवरकर पाटील यांच्या मागणीनुसार विविध सुविधा पुरविल्या आहेत. आता नातेपुते ग्रामीण रूग्णालयात १०० खाटांचे महिला रुग्णालयाची मागणी केली असून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी १०० खाटांचे महिला रुग्णालय मंजूर केल्याची माहिती माळशिरस तालुका शिवसेनाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

नातेपुते हे सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामाचे ठिकाण आहे. गावाच्या आजूबाजूला बऱ्याचशा अंतरावर कुठेही महिला हॉस्पिटल नसल्याने महिला रुग्णांचे हाल होतात, याबाबत माढा येथे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत राजकुमार हिवरकर पाटील यांनी महिला रूग्णालयाबाबत सुचविले. यावर चर्चा होऊन शिवाजी सावंत यांनी आरोग्यमंत्र्यांशी बोलणे करून मंजुरी देण्याबाबत कळविले. यावेळी स्वीय सहाय्यक रविंद्र अनभुले, रवी जाधव, टकले उपस्थित होते.

आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ राधाकिसन पवार आरोग्य सेवा पुणे मंडळ यांनी त्याच दिवशी मंजुरीचे पत्र सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांना तात्काळ दिले आहे. या पत्रकार परिषदेत नातेपुते शहर अध्यक्ष पोपटराव शिंदे, दहिगाव जि. प. गटप्रमुख प्रमोद चिकणे, दादाभाई मुलाणी, सनी बरडकर, गणेश कांबळे, सोनू लांडगे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!