Latest News

शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचा सक्रिय विकासदृष्टिकोन अधोरेखित ; मुंबईतील प्रमुख बैठकांना उपस्थिती

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात 

अकलूज : सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारे शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची कार्यतत्परता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

मेंढापूर तालुका पंढरपूर येथे MIDC स्थापन करून औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महसूल विभागाच्या अखत्यारितील जमिनीच्या हस्तांतरणाच्या संदर्भात विधान भवन मुंबई येथे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या दालनात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत आ.अभिजीत पाटील यांच्यासह शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सक्रिय पाठपुरावा केला. ही MIDC साकारल्यास पंढरपूर परिसरात रोजगारनिर्मिती, उद्योगधंद्यांची वाढ व स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.

त्याचप्रमाणे मंगळवेढा येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचे भव्य स्मारक स्थापन करण्यासाठी विधान परिषद सभापतींच्या दालनात आयोजित बैठकीतही शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी आपली उपस्थिती व सकारात्मक भुमिका बजावली.
या बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आ. विजयकुमार देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, अभिजीत पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

या दोन्ही बैठका म्हणजे केवळ योजनांची चर्चा नव्हे, तर विकासाची दिशा निश्चित करणारे टप्पे ठरले आहेत. शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या या सक्रिय सहभागातून त्यांच्या सामाजिक बांधिलकीची व दूरदृष्टीची प्रचिती पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे.

“फक्त राजकारण नव्हे, तर समाजकारण हाच माझा खरा हेतू आहे,” हे त्यांचे विचार त्यांच्या कृतीतून सातत्याने दिसून येतात. शिवतेजसिंह मोहिते पाटील हे केवळ तरुण नेतृत्व नसून, जनतेच्या प्रश्नांशी थेट भिडणारा आणि शासकीय यंत्रणेकडे ठोस पाठपुरावा करणारा खऱ्या अर्थाने संवेदनशील आणि दूरदृष्टी असलेला नेता आहेत. स्थानिकांच्या हितासाठी ते सातत्याने मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा करत आहेत. प्रत्येक मुद्द्याकडे केवळ राजकीय नाही, तर सामाजिक बांधिलकीच्या नजरेतून पाहण्याची त्यांची शैली उल्लेखनीय आहे.

महत्वाकांक्षी प्रकल्प असो की सांस्कृतिक स्मारक शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची उपस्थिती म्हणजे आश्वासक दिशादर्शक ठरते. त्यांची सक्रियता, अभ्यासू दृष्टिकोन आणि निर्णयक्षमता ही आजच्या काळात नव्या पिढीच्या नेतृत्वासाठी प्रेरणादायी ठरावी अशीच आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!