Latest News

थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अर्जुनदादानी लावला शेत रस्त्याचा प्रश्न मार्गी ; पुरंदावडे (नाळेमळा) येथील नागरिकांकडून समाधान व्यक्त 

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात

अकलूज : पुरंदावडे (नाळेमळा) येथे गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गावातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शेत रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लावण्यात आला. माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती  अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि रस्त्याच्या कामास गती दिली. त्यांच्या प्रयत्नांमुळे या रस्त्याचे भूमिपूजन अर्जुनदादांच्या हस्ते करण्यात आले, यामुळे शेतकरी वर्गात मोठा आनंद पाहायला मिळाला.

हा रस्ता सुरू झाल्याने गावातील शेतकरी शेतीसाठी ये-जा करण्यास अधिक सोयीस्कर होणार असून शेतीच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या वाहनांची वाहतूकही सुलभ होणार आहे. हा रस्ता अनेक वर्षांपासून रखडला होता, मात्र अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्या पुढाकारामुळे अखेर हा प्रश्न सुटला आहे.

या कार्यक्रमास अनेक ग्रामस्थ आणि प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. यामध्ये सदशिवनगरचे सरपंच विरकुमार दोशी, पुरंदावडे सरपंच सौ. राणी मोहिते, माजी सरपंच भगवान पिसे, माजी चेअरमन पोपट गरगडे, उपसरपंच देवीदास ढोपे, माजी सरपंच बाळासाहेब शिंदे, शिवराज निबाळकर, विठ्ठल अर्जुन, संतोष शिंदे, माजी उपसरपंच उदय धाईजे, उपसरपंच विष्णु भोंगळे सर, सदस्य तानाजी ओवाळ, सदस्य महादेव बोराटे, दादा ऐवळे, दादा मोहिते, ज्ञानदेव चव्हाण, शेखर सावंत, हरी राऊत, बाळासाहेब पालवे, सुदाम ढगे, बाळू शेलार, संजय मोहिते, अनिल पाटील, संकल्प बोराटे आणि मोठ्या संख्येने लाभधारक शेतकरी उपस्थित होते.

रस्ता सुरू होण्याच्या निर्णयामुळे शेतकरी वर्गात मोठ्या समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शेतमाल वाहतुकीची अडचण दूर होणार असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही टळणार आहे. या उपक्रमाबद्दल शेतकरी वर्गाने अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांचे आभार मानले आहेत.

हा उपक्रम म्हणजे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी सुविधा ठरणार असून, भविष्यात आणखी असे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवले जातील, असा विश्वास अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!