अकाऊटंटने लावला अकलाई हॉस्पिटलला चुना ; 36 लाखाचा अपहार केल्याप्रकरणी दाखल झाला गुन्हा
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : ” जिस थाली मे खाते है उस खाली मे छेद नही किया करते” अशी हिंदी भाषेतील जुनी पण तेवढीच प्रचलित म्हण आहे. याच म्हणीला बिलकुल विरोधी कृत्य अकलूज येथील एका हॉस्पिटलमधील महिला अकाऊटंटने केले असून या महिलेने तब्बल 36 लाखांचा चुना सदर हॉस्पिटल ला लावला आहे.
याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील अकलाई आय.सी.यु. ॲण्ड मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटल हे एक नामांकित हॉस्पिटल आहे. येथे अकौंट विभागामध्ये काम करणारी भावना कैलासपती दुबे उर्फ भावना /सना साहिल शेख रा मुलानीवस्ती माळेवाडी अकलुज ता माळशिरस जि. सोलापूर हिने रुग्णांकडून हॉस्पिटलचे येणारे बिल हे हॉस्पिटल चे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अकलुज अकौंट नंबर 60352702161 व सीएसबी बँक शाखा अकलुज अकौंट नंबर 050904364496195001 वर जमा करून घेणे आवश्यक असताना तिने ब-याच रुग्णांची बिले त्यांचे वैयक्तिक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अकलुज खाते नंबर 25051796936 वर घेतली असल्याचे आढळून आले आहे.
तसेच रोख स्वरुपात आलेली बिले ही हॉस्पिटलचे खात्यामध्ये जमा न करता ते तिने स्वतःकडे ठेवली असून स्वतःच्या खात्यावर तसेच रोख स्वरुपात रकमा स्विकारुन हॉस्पिटलच्या नावाच्या रिसीप्ट दिलेल्या आहेत. फिर्यादीने त्यांचे रेकॉर्ड नुसार खात्री केली असता आरोपी मजकुर हिने दि 09/07/2021 ते दिनांक 28/06/2023 या कालावधील ऑनलाईन स्वरुपातील 20,97,302 / – ( वीस लाख सत्यानव हजार तिनशे दोन) रुपये हॉस्पिटलचे खात्यावर जमा करुन न घेता स्वतःचे वरील अकौंटला जमा करुन घेतले आहेत व रोख स्वरुपातील अंदाजे 15 लाख रुपये हे त्यांनी हॉस्पिटलचे खात्यावर जमा न करता स्वतःसाठी वापरुन एकुण 35,97,302 /- ( पस्तीस लाख सत्यानव हजार तिनशे दोन) रुपयाचा अपहार केला असल्याची फिर्याद डॉ.भुषण भारत चंकेश्वरा वय 36 वर्ष व्यवसाय वैदयकिय रा. गांधीचौक, अकलुज यांनी अकलूज पोलिसांत दिली आहे.
डॉ. चंकेश्वरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भावना कैलासपती दुबे उर्फ भावना /सना साहिल शेख यांच्या विरोधात अकलुज पोलीस ठाणे गुर नं 467/2023 भादविक 408 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जाधव हे करीत आहेत.



