अनिकेत देशमुख यांची शिव सहकार सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : वंदनीय हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणार्या शिव सहकार सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी माळशिरस तालुक्यातील अनिकेत महेशकुमार देशमुख यांची निवड झाली आहे.
मुंबई येथील हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे भवन मध्ये झालेल्या बैठकीत शिव सहकार सेनेचे अध्यक्ष खासदार तथा माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांचे हस्ते त्यांना हे नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, ज्येष्ठ नेते एन.डी.देशमुख, कार्याध्यक्ष अॅड.अनंत संकुडे, सरचिटणीस शिवाजी पाटील, खजिनदार प्रमोद पार्टे, उपाध्यक्ष नागेश वनकळसे, आनंदराव यादव, आशाताई मामिडी, योगेश शेटे, सुमित साखरे, चैतन्य देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. या निवडीनंतर अनिकेत देशमुख यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी शिव सहकार सेनेच्या माध्यमातून ही विचारांची चळवळ बळकट करणार आहे. या त्यांच्या निवडीनंतर माळशिरस तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिव सहकार सेनेला अनिकेत देशमुख यांच्या माध्यमातून चांगला चेहरा व युवक नेतृत्व मिळाले असल्याची चर्चा जिल्हाभर होताना दिसत आहे.



