लवंग मंडळात महसूल सप्ताहानिमित्त वृक्षारोपण आणि शिवराजस्व अभियान उत्साहात संपन्न

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : महसूल विभागाच्या वतीने १ ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान साजऱ्या होत असलेल्या महसूल सप्ताहानिमित्त लवंग मंडळात विविध उपक्रम राबविण्यात आले. उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार सुरेश शेजूळ, निवासी नायब तहसीलदार अमोल कदम आणि महसूल नायब तहसीलदार जावीर यांच्या नेतृत्वात हे उपक्रम यशस्वीपणे पार पडले.
३ ऑगस्ट रोजी लवंग येथील स्मशानभूमी आणि मोक्ष मार्गावर वृक्षारोपण करण्यात आले. तर ४ ऑगस्ट रोजी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी एक विशेष शिबीर हनुमान विद्यालय, लवंग येथे आयोजित करण्यात आले.
या शिबिरात आधारकार्ड, संजय गांधी योजना ओळखपत्र, जात, उत्पन्न, डोमिसाईल, SEBC, नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक दाखले, ७/१२ व ८अ फेरफार, रेशनकार्ड अर्ज, मतदार नोंदणी (नमुना ६), अग्रीस्टॅक अॅप्रोल, DBT लाभ, आरोग्य तपासणी यांसारख्या विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लवंग ग्रामपंचायतीचे उपसरपंच सज्जन दुरापे होते. यावेळी मंडळ अधिकारी विजय जाधव, ग्राम महसूल अधिकारी सुषमा निकम, अनिल घेरडे, सोमनाथ गोडसे, योगेश्वर बोदमवाड, ग्रामपंचायत अधिकारी मोहन मिटकल, माजी तंटामुक्त अध्यक्ष युवराज वाघ, माजी उपसरपंच दत्तात्रय चव्हाण, पोलिस पाटील विक्रम भोसले, पंचायत सदस्य तानाजी रणसिंग व धनाजी चव्हाण, कृषी सहाय्यक कोकाटे, शाळेचे मुख्याध्यापक शिर्के, विज वितरण कंपनीचे साळुंखे, ग्रामीण रुग्णालय तांबवेचे डॉ. शेख, महसूल सेवक कस्तुरे, अशोक कदम, शहाजी हंकारे, तसेच महा ई सेवा केंद्र व आपले सरकार केंद्र संचालक, आरोग्य विभाग व विज वितरण कर्मचारी, शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन महसूल सेवक बाळासाहेब सरवदे यांनी केले.



