Latest News

डॉ. एम.के.इनामदार व डॉ. श्रद्धा जवंजाळ यांनी केले कॅन्सर व्हॅन चे स्वागत ; अकलूज मध्ये 186 जणांची कर्करोग तपासणी

महर्षि डिजीटल न्यूज 

अकलूज : महाराष्ट्र शासनाच्या असंसर्गिक रोग कार्यक्रमांतर्गत अकलूज मध्ये दाखल झालेल्या कर्करोग अर्थात कॅन्सर मोबाईल व्हॅन चे स्वागत व उद्घाटन येथील प्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ.एम.के इनामदार व पिंक रिव्ह्यू लेशन या सामाजिक संघटनेच्या संस्थापक सदस्या डॉ‌.श्रध्दा जवंजाळ यांचे शुभहस्ते संपन्न झाले. या माध्यमातून अकलूज मध्ये 186 जणांची कर्करोग तपासणी करण्यात आली.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ ‌महेश गुडे, स्रीरोग तज्ञ डॉ. मोनिका मिसाळ, दंत शल्य चिकित्सक डॉ. श्रध्दा नरवने,दंत शल्य चिकित्सक डॉ. सावन पालवे यांचेसह सह अधिसेविका, परीसेविका, सर्व परीचारीका, सर्व अधिपरीचारीका व रुग्णालयातील सर्व कर्मचारी, आशा सेविका उपस्थितीत होते.

 कॅन्सर डायक्नोस्टिक व्हॅन मार्फत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ ‌सुहास माने व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली अकलुज उपजिल्हा रुग्णालयात कर्करोग तपासणी पार पडली. तपासणी झालेल्यांपैकी बारा संशयित रुग्णांचे नमुने पुढील तपासणी साठी पाठविण्यात आल्याची माहिती अकलूज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश गुडे यांनी दिली.

यावेळी पुढे बोलताना वैद्यकीय अधीक्षक डॉ ‌महेश गुडे यांनी शासनाच्या कर्करोग तपासणी शिबिराचा उद्देश,फादा सांगुन नागरीकांनी शासनाच्या या चांगल्या सेवेचा लाभ घेवुन कॅन्सर मुक्त होण्याचे अवाहन केले.

स्रिरोग तज्ञ डॉ.मोनिका मिसाळ यांनी गर्भाशय व स्तनाचा कर्करोग याची लक्षणे आणि ऊपायांची माहिती दिली.तसेच महिलांनी न संकोचता ऊपाचार करण्यासाठी पुढे येण्याचे अवाहन केले.

दंत शल्य  चिकित्सक डॉ. श्रध्दा नरवने यांनी मुखाच्या कर्करोगाची व ऊपायांची माहिती दिली तर दंत शल्य  चिकित्सक डॉ.सावन पालवे यांनी व्यसनांचे दुष्परीणाम, मुखाच्या कर्करोगाची कारणे सांगून नागरीकांनी व्यसनांपासुन दुर राहुन निरोगी व आनंदी जिवन जगण्याचा सल्ला यावेळी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!