शहर

७९वा भारतीय स्वातंत्र्य दिन रावबहाद्दूर गट (बिजवडी) शाळेत उत्साहाने साजरा

महर्षि डिजीटल न्यूज 

अकलूज : जहाँ डाल डाल पर सोनेकी चिडीयाँ करती है बसेरा… वो भारत देश है मेरा..वो भारत देश है मेरा! अशा महान भारत  देशाचा ७९वा स्वातंत्र्य दिन रावबहाद्दूर गट (बिजवडी) शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे बिजवडी गावचे सरपंच तथा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज शिंदे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.आशा भजनावळे  या होत्या. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

                 शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत राऊत यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये शाळेची माहिती त्यांनी दिली.  निपुण भारत अंतर्गत माता पालक गटप्रमुखांचा सत्कार करण्यात आला. गटप्रमुखांनी आपले मनोगत व्यक्त केले. सांगली प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये माळीनगर केंद्रात सातवा क्रमांक पटकाविल्याबद्दल इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी श्रेया भजनावळे हिचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्या बाई होळकर पुरस्कार अंगणवाडी सेविका सारिका विजय चव्हाण यांना मिळाल्याबद्दल त्यांचे देखील अभिनंदन व सत्कार करण्यात आला.

      शाळेची आकर्षक सजावट, रांगोळी, फलक लेखन अशा उत्साह पूर्ण वातावरणामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेली देशभक्तीपर नृत्य गीते, भाषणे यामुळे पालक वर्ग अतिशय आनंदित झाला.विद्यार्थ्यांना विविध दानशूर व्यक्तींनी खाऊ दिला. 

          सदर कार्यक्रमासाठी उपसरपंच अशोक मदने, स्वाती जाधव, दिपाली लोखंडे, इब्राहिम नदाफ, सागर भजनावळे, शिवाजी चव्हाण, अर्चना चव्हाण, रतन लोखंडे, अक्षय मोहिते, राजेंद्र चव्हाण, आशा टिळेकर,  विकास लोखंडे, सुभाष ढोबळे, शहनाज नदाफ, रेश्मा नदाफ, मालन जगताप, सुनिता जगताप, रतन जगताप, अर्चना कांबळे, अश्विनी साठे, पूजा ढोबळे, अंगणवाडी सेविका सारिका चव्हाण, गिरीजा गेजगे असे बहुसंख्येने शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमासाठी बिजवडी गावच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजमीर फकीर यांनी केले, तर आभार श्रीकांत राऊत यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!