Latest News

‘सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार…’रामराजे नाईक निंबाळकर यांचे आव्हान कोणाला भोवणार?

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
फलटणच्या प्रतिष्ठित नाईक निंबाळकर कुटुंबावर आयकर विभागाने टाकलेल्या धाडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या धाडींनंतर ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी ‘सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार’ असा स्टेटस ठेवत अप्रत्यक्षपणे विरोधकांना धक्का दिला आहे. त्यांच्या या इशार्‍यामुळे राजकीय वातावरण तापले असून, हे आव्हान नेमके कोणाला भोवणार, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर पडलेल्या आयकर धाडींमुळे हे प्रकरण राजकीय रंग घेत आहे. सर्व समावेशक राजघराणे असलेल्या प्रतिष्ठित कुटुंबाला अशाप्रकारे लक्ष्य करण्यामागे राजकीय सूडबुद्धी असल्याचा आरोप केला जात आहे. विशेषत: रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह त्यांच्या दबाव टाकण्यासाठी आयकर विभागाची धाड टाकण्याचा प्रयोग केला असल्याचेे बोलले जात आहे.

परंतु अशा प्रकारांना न जुमानता आयकर धाडींनंतर रामराजे नाईक निंबाळकर यांचे आक्रमक रूप पहायला मिळाले. ‘सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार’ या त्यांच्या स्टेटसने एकच खळबळ उडाली. त्यांच्या या इशार्‍याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. शिवाय हे वक्तव्य फक्त एक इशारा नसून, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादळाची चाहूल आहे. त्यांचे हे आव्हान नेमके कोणाला भोवणार, हे येणारा काळच ठरवेल. त्यांच्या पुढील पावलांवर सर्वांचे लक्ष आहे आणि त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा कलाटणीबिंदू निर्माण होण्याची शक्यता आहे.

नाईक निंबाळकर कुटुंब हे फलटण आणि परिसरातील अत्यंत प्रतिष्ठित आणि मराठा समाजा बरोबरच सर्व जाती धर्मातील जनतेचे प्रतिनिधित्व करणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सासर या घराण्यात असल्याने या कुटुंबाला समाजात विशेष मान आहे. त्यांच्या समाजातील प्रभावामुळेच त्यांना टारगेट केले जात असल्याचा आरोप काही राजकीय निरीक्षकांनी केला आहे. फलटणचे नाईक निंबाळकर घराणे हे इतिहास, परंपरा आणि राजकीय वर्चस्वाचे प्रतीक आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांशी असलेल्या नात्यामुळे या घराण्याला विशेष स्थान मिळाले आहे. अनेक शतकांपासून महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासात आपला ठसा उमटवणारे हे घराणे आजही आपल्या योगदानाने ओळखले जाते. निंबाळकर घराण्याने इतिहासभर राजकारणात सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांनी पेशवे काळात आणि नंतर ब्रिटिश कालखंडातही राजकीय वर्चस्व राखले. स्वातंत्र्यलढ्यातही या घराण्याच्या सदस्यांनी सहभाग नोंदविला. स्वातंत्र्यानंतरही निंबाळकर घराण्याने राजकारणातही आपली खास ओळख निर्माण केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!