Latest News

माळशिरस वकिलांकडून संविधानाच्या जागृतीसाठी राज्यस्तरीय पथनाट्य आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन

महर्षि डिजीटल न्यूज 

माळशिरस : जागर संविधानाचा अभियानाअंतर्गत भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय पथनाट्य व रांगोळी स्पर्धा २०२४ या स्पर्धेचे आयोजन  माळशिरस वकिलामार्फत करण्यात आले असून त्याची सुरुवातवकिल संघटनेचे अध्यक्ष सौ. मोहिनी देव यांच्या हस्ते माळशिरस वकिल संघटनेच्या कार्यालयातून करण्यात आली.

पथनाट्य स्पर्धेसाठी पहिले बक्षीस : १०,०००/- स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, दुसरे बक्षीस : ७,०००/- स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, तिसरे बक्षीस : ५,०००/-  स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र

रांगोळी स्पर्धेसाठी पहिले बक्षीस : 1HP आटा चक्की, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, दूसरे बक्षीस : मिक्सर ग्राईंडर, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, तिसरे बक्षीस : डिनर सेट, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

प्रवेश विनामुल्य राहणार असून स्पर्धकांना वयाची व शिक्षणाची अट नाही. नाव नोदणी ची अंतिम तारीख 15 जानेवारी 2025 असून स्पर्धा ही दि. १९/०१/२०२५ रोजी सकाळी ९.०० वा. माळशिरस येथे सुरू होईल व स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण दि.२५/०१/२०२५ रोजी करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला / संघाला प्रमाणपन्न देण्यात असल्याची माहिती आयोजक समितीचे ॲड. सुमित सावंत आणि ॲड.धनंजय बाबर यांनी दिली आहे.

आयोजक समिती मध्ये ॲड. सुनिता सातपुते, ॲड. रजनी गाडे-सोनवळ, ॲड. धनंजय बाबर, ॲड. अमृत भोसले ॲड. सुमित सावंत, ॲड. भारत गोरवे, ॲड. नितीन भोसले, ॲड. वैभव धाईजे, ॲड. अजिंक्य नवगिरे ॲड. सुयश सावंत, ॲड. धैर्यशिल भोसले, ॲड. वैशाली कांबळे, ॲड. मनोज धाईंजे ॲड. अभिषेक चंदनशिवे, ॲड. निलेश जाधव, ॲड. दत्तात्रय सावंत व सर्व सन्माननीय माळशिरस वकील संघटना सदस्य, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांचा समावेश आहे.

अधिक माहितीसाठी  ॲड.सुमित सावंत मो.9970944991, ॲड. भारत गोरवे मो.9850736190, ॲड. सुयश सावंत मो.8483844049, ॲड. वैशाली कांबळे मो.8329525003 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!