Latest News

बुक्की मारून पाडले दोन दात ; रोख रकमेसह दुचाकीची चोरी करणाऱ्याला नातेपुते पोलिसांनी टाकले आत

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात 

नातेपुते : कमी किमतीत डस्ट देण्याचे आम्हीच दाखवत शहराबाहेर नेऊन मारहाण केलेल्या व दुचाकीसह रोख रकमेची चोरी केलेल्या आरोपीला नातेपुते पोलिसांनी केवळ चार दिवसातच पकडून गजाआड केले असून त्याच्याकडून रोख रकमेसह दुचाकी हस्तगत केली आहे.

याबाबत नातेपुते पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये दि. ०९/०९/२०२४ रोजी दुपारी ०३:१५ वा. सुमारास अज्ञात इसमाने नातेपुते येथील शिवशंकर बझारचे समोर मी तुम्हाला कमी किमतीमध्ये डस्ट देतो माझे सोबत चला असे म्हणून नातेपुते शहरातील मधुर मिलन मंगल कार्यालयापासून ०१ किमी अंतरावर बंडगर खोरी येथे नेऊन तेथे शिवीगाळी व दमदाटी करून खिश्यात असणारे सर्व पैसे मला दे, असे म्हणून तोंडावर बुक्या मारून दोन दात पाडून खिश्यातील ५०००/-रूपये जबरदस्तीने काढून घेतले व २५०००/-रू. किंमतीची मोटार सायकल HONDA कंपणीची ACTIVA त्याचा आरटीओ नंबर MH45-AJ-5103 ही जबरदस्तीने घेवून तेथून अज्ञात आरोपी पळून गेला असल्याची फिर्याद रामचंद्र बबन रानगट, रा. कांरूडे, ता. माळशिरस यांनी नातेपुते पोलिसात दिली होती. 

सदर गुन्ह्याचा तपास करताना नातेपुते पोलीस ठाणेचे पोना राकेश लोहार करत असताना त्यांना सिसिटीव्ही फुटेज आधारे व गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहिती नुसार, सदर गुन्हा करणारा सराईत रेकॉर्डवरील आरोपी मौजे मांडवे, ता. माळशिरस, येथील शिवारात संशयितरित्या फिरत असल्याचे समजले. त्यानुसार नातेपुते पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक महारुद्र परजने यांना माहिती देवुन गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदार यांना तात्काळ रवाना करुन मौजे मांडवे, ता. माळशिरस, येथे सापळा लावुन आरोपीस ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) बालाजी हनुमंत पवार रा. खेड भोसे, ता. पंढरपुर, जि. सोलापुर असे असल्याचे सांगितल्याने त्यांना ताब्यात घेवुन अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्यांनी गुरनं ३०३/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४),३०९ (६),३५२, ३५१ (२) (३) प्रमाणे गुन्हा केल्याचे कबुल दिल्याने आरोपीनामे बालाजी हनुमंत पवार, रा. खेडभोसे, ता. पंढरपुर, जि. सोलापुर, यास अटक करुन सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले ५,०००/- रु. रोख रक्कमपैकी ३०००/- रूपये रोख रक्कम व जबरीने घेवुन गेलेली २५,०००/- रु. किंमती HONDA कंपनीची ACTIVA त्याचा आर टी ओ नंबर डभ्४५. ।श्र.५१०३ असे एकुण २८,०००/- रु. मुद्देमाल आरोपीचे ताब्यातुन जप्त करण्यात आला आहे. आरोपी नामे बालाजी हनुमंत पवार रा. खेडभोसे, ता. पंढरपुर, जि. सोलापुर, याचेवर यापूर्वी असलेले दाखल गुन्ह्याची माहीत पंढरपुर शहर पोलीस ठाणे, करकंब पोलीस ठाणे, मोहळ पोलीस ठाणे, कुर्डेवाडी रेल्वे पोलीस ठाणे, दौंड रेल्वे पोलीस ठाणे, अकलुज पोलीस ठाणे येथे चोरी, जबरी चोरी व शरिराविषयक गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर अकलुज उपविभाग अकलुज यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक महारुद्र परजने, पोसई धनाजी ओमासे, पोहेकॉ राहुल रणनवरे, पोहेकॉ संदेशi पवार, पोहेकॉ नवनाथ माने, पोना अमोल वाघमोडे, पोना  राकेश लोहार, पोकॉ नितीन पनासे, पोका अस्लम शेख, होमगार्ड सुहास पवार व सायबर पोलीस ठाणेचे पोकॉ युसुफ पठाण यांनी केली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोसई धनाजी ओमासे करीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!