माळशिरस तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी ; आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नातून ६२ कोटी ९७ लाखांचा निधी
महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून माळशिरस तालुक्यातील रस्त्यांसाठी 62 कोटी 97 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. याबाबत आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
मंजूर झालेल्या रस्त्यामध्ये वेळापूर ते म्हेत्रेमळा रू.५ कोटी ५४ लाख , एन.एच.२६५ ते कोंडबावी रस्ता रू. ७ कोटी १४ लाख, चाकोर ते कुरणबंगला रस्ता रू.६ कोटी ६ लाख,यशवंत नगर ते गिरझणी रस्ता रू.७ कोटी २६,एन.एच.२६५ जी ते वाफेगाव रस्ता रू.१० कोटी,एन.एच.१६५ जी २५/४ ते वाघोली रस्ता रू.१० कोटी ६७,बडेखान (सदशिवनगर) ते उंबरे रस्ता रू.११ कोटी ७१ इजिमा १७९ ते खरातवस्ती-शिवामृत डेअरी रस्ता रु.४ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ६२ कोटी ९७ लाख रूपये मंजूर करून आणले त्याबद्दल तालुक्यातील नागरिकांनी आ.मोहिते-पाटील यांचे आभार मानले.