वारी दरम्यान 1 लाख 9 हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी ; दोन महिला ताब्यात, अवैध ड्रोन उडवणाऱ्यावर गुन्हा दाखल
महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
अकलूज : जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या दरम्यान अकलूज पोलिसात तीन गुन्ह्यांची नोंद करण्यात आले असून दोन चोरीच्या घटनेसह अवैध ड्रोन उडवणाऱ्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या घटनेतील दोन महिलांना पकडण्यात पोलिसांना यश आले असेल तरी मुद्देमाल मात्र मिळू शकला नाही. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करण्यात येत आहे.
अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत अकलूज परिसरातील गांधी चौक येथे बाळासाहेब सदाशिव बागाव वय 40 वर्ष राहणार वडोली तालुका माढा यांचे दीड तोळा वजनाची 80 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने गळ्यातून हिसकावून चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत अकलूज पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर 363/ 2024 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303(2) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार अमोल बकाळ करत आहेत.
दुसऱ्या घटनेत महाराज पालखी सोहळा पाहण्यासाठी अकलुज येथे आल्या असता पालखीचे दर्शन घेवुन खरेदी करीत असताना फिर्यादी दिव्या अर्जुन शिंदे वय 26 राहणार पाणी तालुका माळशिरस यांच्या कडेवर असलेला त्यांचा मुलगा रडु लागल्याने फिर्यादीने पाहिले असता फिर्यादीचे पाठीमागे गर्दीमध्ये असलेल्या महिलेने फिर्यादीचे मुलाचे गळयातील काळया रांगाचे दोऱ्यात गुंफलेले सोन्याचे बदाम हिसका मारून तोडुन घेतल्याचे लक्षात आले त्यावेळी फिर्यादी यांनी सदर महिलेचा हात पकडला त्यावेळी त्यामहिलेने फिर्यादीची नजर चुकवुन गर्दीचा फायदा घेवुन तिचे सोबतचे दुसरे महिलेच्या हातात दिले त्यावेळी दुसरी महिला तेथुन पळुन गेली. त्याचप्रमाणे तेथे यातील साक्षिदार स्वाती संजय गाडे रा. संग्रामनगर ता. माळशिरस यांचे गळयातील एक तोळयाचे काळया मण्यात गुंफलेले मंगळसुत्र कोणीतरी अज्ञात चोरटयाने हिसका मारून चोरून नेले आहे. तसेच सुरभी मोनेश दोशी रा. सदभाऊ चौक अकलुज यांचे लहान मुलाचे गळयातील एक ग्रॅम वजनाचे काळया रंगाचे गोफात गुंफलेले बदाम कोणीतरी हिसका देवुन चोरून नेले आहे. असा एकुण २९,०००/- रू किमतीचा मुददेमाल चोरून नेला आहे.
या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून दुर्गाबाई अनिल पवार व 28 व ताई सावडा जाधव राहणार उंब्रज तालुका कराड यांना अटक करण्यात आली असून गुन्हा रजिस्टर नंबर 365/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309/(4) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे. चोरीचा माल हस्तगत करण्यात मात्र पोलिसांना अपयश आले आहे. अधिक तपास सपोनी श्रीकांत निकम करीत आहेत.त्याच बरोबर अकलुज येथील साशिवराव माने विद्यालयाचे प्रांगणात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील गोल रिंगण सोहळा कार्यक्रम चालु असताना महादेव नवनाथ कोथुळे वय.36 वर्षे रा. हिंगणे होम कॉलनी, करवेनगर, ता. हवेली जि. पुणे याने कोणतिही प्रशासकीय पूर्व परवानगी न घेता त्याने बेकायदेशीर रित्या त्याचे ताब्यातील ड्रोन कॅमेराद्वारे पालखी रिंगण सोहळ्याचे चित्रीकरण करणेस ड्रोन रिमोट कंट्रोलला मोबाईल हँडसेट जोडून मोबाईल हँडसेट व रिमोटद्वारे ड्रोन कॅमेरा उडवून बेकायदेशीररित्या चित्रीकरण करून त्याने पालखी सोहळ्यातील लोकांची सुरक्षितता धोक्यात आणण्याचे कृत्य केलेले आहे. त्याचेविरूद्ध सरकारतर्फे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 प्रमाणे पो.ह. शिवकुमार मदभावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्याद दाखल करण्यात आली असून तपास पो. ह. अमोल बकाळ करत आहेत.