पराभवाच्या भितीने भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली… त्यामुळे जिभ घसरली आणि पातळी ओलांडली

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : महाविकास आघाडीचे माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांना मिळणारा अभुतपूर्व प्रतिसाद आणि ‘रामकृष्ण हरी… वाजवा तुतारी…’ हे घोषवाक्य सतत कानी पडत असल्याने भारतीय जनता पक्षातील उमेदवाराच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यामुळे त्यांच्या नेत्यांकडून राजकारणाची पातळी ओलांडून जिभ घसरल्यासारख्या भाषेचा उपयोग होऊ लागला आहे.
असे म्हणतात पुरोगामी महाराष्ट्राला सभ्य राजकारणाचा वारसा लाभला आहे. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असते निवडणुकांच्या वेळेस टिका-टिप्पणी होतच असतात. परंतु याचा अर्थ एखाद्या गुंडाप्रमाणे ‘मी त्यांना सोडणार नाही…आम्ही हे खपवून घेणार नाही…’ धमक्या देणं राजकारणाला शोभत नाही. राजकारणातच नव्हे तर या जगात कोणीच ‘ताम्रपट’ घेऊन जन्माला आलेलं नाही. त्यामुळे आज तुम्ही सत्ताधारी असाल तर उद्या दुसरा कोणी असणार आहे. त्यामुळे टिका-टिप्पणी करतानाही किती खालच्या भाषेचा उपयोग व्हावा याला ‘सभ्य’ राजकारण्यांनी तरी मर्यादा घालाव्यात.
असो वास्तविक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीचे माढा मतदार संघातील उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यावर होत असलेले खालच्या पातळीवर होत असलेले आरोप हे सिध्द करत आहे की त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. धैर्यशील मोहिते-पाटील यांना मतदार संघातील प्रत्येक तालुक्यात, तालुक्यातील प्रत्येक गावात मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद ‘रामकृष्ण हरी वाजवा तुतारी’ चा सर्वत्र होत असलेला निनाद ऐकून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची जिभ घसरू लागली असून पातळी ओलांडून टिका होताना दिसत आहे.
शरद पवार आणि मोहिते-पाटील परिवारांशी गेल्या 60 ते 70 वर्षांपासून अटॅच असलेल्या व त्यांच्या विचारांना मनणार्या मतदारांना मात्र अशा प्रकारचे राजकारण आणि तसल्या प्रकारची टिका सहन होत नसल्याने मतपेटीतून आम्ही नक्कीच उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे.