पंतप्रधानांच्या माळशिरस दौऱ्यानिमित्त वाहतूक मार्गात बदल ; सभेसाठी येताना या वस्तू आणण्यास मनाई

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : भारतीय जनता पक्षाच्या माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दिनांक 30 एप्रिल रोजी माळशिरस दौऱ्यावर येत असून यानिमित्ताने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असल्याची तसेच सभेसाठी येण्याबाबतच्या सूचनाही पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनातून दिल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती देताना पोलीस अधीक्षक कार्यालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सभेस येणाऱ्या नागरिकांची सखोल तपासणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या आगमनाची वेळ सकाळी 10.55 असल्याने तपासणीसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून सकाळी 6.30 वाजलेपासून सभास्थळी पोहोचण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच पंतप्रधानाच्या आगमनापूर्वी किमान एक तास अगोदर नागरिकांनी स्थानापन्न होण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सभेस येताना मोठ्या बॅगा, पाण्याच्या बॉटल, खाद्यपदार्थ, ज्वालाग्रही पदार्थ तसेच विडी, सिगारेट, गुटखा असे पदार्थ सोबत आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
वाहतूक मार्गात झालेल्या बदला संदर्भातील माहिती मध्ये नातेपुते कडून माळशिरस ते अकलूज जाणारा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यासाठी पर्यायी मार्ग म्हणून नातेपुते फाटा राष्ट्रीय महामार्गाने पाणीव पाटी मार्गे अकलूज व पुढे तसेच अकलूज ते माळशिरस रोड, सभेला येणारी लहान चार चाकी वाहने अत्यावश्यक सेवेची लहान वाहने व शासकीय वाहने वगळून इतर वाहनासाठी मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यांना पर्यायी मार्ग म्हणून अकलूज येथून पाणीव मार्गे पंढरपूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गाने पुढे जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आले आहे.
अकलूज व परिसरातून येणारी वाहने अकलूज माळशिरस रोडवरील 61 फाटा येथून कॅनॉल रोडने 61 फाटा महामार्ग टी पॉईंट येथून माळशिरस शहरात जाणाऱ्या रोडने पालखीतळ व परिसर येथे पार्किंग करावी तसेच वेळापूर, पंढरपूर परिसरातून येणारी वाहने 61 फाटा महामार्ग टी पॉईंट येथून माळशिरस शहरात जाणाऱ्या रोडने पालखीतळ व परिसर येथे पार्किंग करावेत. शिवाय फलटण मान खटाव व नातेपुते परिसरातून येणारी वाहने यादव पेट्रोल पंप माळशिरस येथून शहरात न जाता बायपास महामार्गाने 61 फाटा महामार्ग टी पॉईंट येथून माळशिरस शहरात जाणाऱ्या रोडने पालखीतळ व परिसर येथे पार्किंग करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
व्हीआयपी पार्किंग साठी पालखीतळ सभेसाठी आलेल्या वाहनांसाठी बीज केंद्राची जागा सभेसाठी येणारी बस व मोठी वाहने जोशी यांचे पालखी तळावरील शेत तसेच माळशिरस शहरातून येणारे दुचाकी वाहने कन्या प्रशाला येथे पार्किंग साठी निश्चित करण्यात आले असल्याची माहितीही प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.