१४ गावाच्या जिल्हा परिषद शाळेतील ३१५० विद्यार्थ्यांना दफ्तर वाटपाचा शिवतेजसिंहांच्या हस्ते शुभारंभ ; महाळूंग जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांना दफ्तर वाटप
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवकिर्ती युवा मंचच्या वतीने महळूंग जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दफ्तर वाटपाचा शुभारंभ आज शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी स.म.शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र सावंत पाटील, गटशिक्षण अधिकारी धनंजय देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर, सुहास गाडे, माजी पंचायत समिती सदस्य अनिल जाधव, नगरसेवक रतन सिंह रजपूत, अनिल मुंडफणे , तानाजी भगत, सोमनाथ मुंडफणे, रावसाहेब सावंत पाटील, मोहसिन पठाण, संदीप घाडगे, रशीद मुलाणी, रमेश देवकर, संग्रामसिंह राजपूत, सागर यादव, सतीश पवार, मदन भगत, मुख्याध्यापक बाळासाहेब साठे उपस्थित होते.
शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी विविध उपक्रम राबविले जातात. या वर्षी माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील १४ गावातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील सुमारे ३१५० विद्यार्थ्यांना दफ्तर वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला असून त्यापैकी महाळुंग गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दफ्तर वाटपाचा शुभारंभ आज शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंचाचे उपाध्यक्ष अनिल उघडे, प्रीतम एकतपुरे, प्रकाश गायकवाड, शाळेचे सर्व शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रास्ताविक नाचणे मॅडम यांनी करून शाळा राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन सुभाष मिसाळ यांनी केले. तर आभार हनुमंत लोहार यांनी मांडले.



