Latest News

अकलूज उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ ; रस्ता सुरक्षा रॅलीच्या माध्यमातून जनजागृती

महर्षि डिजीटल न्युज

अकलूज : रस्ते अपघातावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आज रस्ता सुरक्षा रॅली काढून करण्यात आली.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या सुरक्षा रॅलीमध्ये दुचाकी, चार चाकी वाहने, तसेच स्कूल बस यांचा सहभाग होता. दुचाकी स्वारांनी हेल्मेट चे महत्व तसेच चार चाकी चालकांनी सीटबेल्टचे महत्त्व सांगत अकलूज परिसरातून रॅली काढली.

यावेळी मोटार वाहन निरीक्षक रमेश सातपुते, संदीप पाटील, सचिन झाडबुके, वैभव राऊत, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सनी कुडपणे, संतोष साळुंखे, अक्षय पोमण, शितल शिंदे ,अश्विनी जगताप, चालक संतोष मखरे पोलीस ठाणे अकलूज चे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी व इतर कर्मचारी, तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सर्व कर्मचारी व ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक व चालक, शिवरत्न शिक्षण संस्था व श्रीराम शिक्षण संस्थेच्या स्कूलबस व स्थानिक स्कूल बस मालक व चालक , वाहन चालक मालक प्रतिनिधी संघटना अकलूज यांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी महर्षि डिजिटल न्यूज बरोबर बोलताना मोटार वाहन निरीक्षक झाडबुके यांनी रस्ता सुरक्षा अभियान व सुरक्षा रॅली बाबत माहिती सांगितली ते म्हणाले दिनांक 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अकलूज उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने या सुरक्षा अभियानादरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या अभियाना अंतर्गत वाहन चालकांना रस्ता सुरक्षेचा संदेश देण्यात येणार आहे.

रस्ते अपघात टाळण्यासाठी आठ नियमांचे पालन करण्याबाबतची माहिती सांगतानाच या अभियाना अंतर्गत नियमांची माहिती दर्शवणारे फलक तसेच स्टीकर्सचे वाटप करण्यात येणार असल्याचे झाडबुके यांनी सांगितले. याशिवाय शाळा महाविद्यालयात तसेच चौकात चौकात सभा घेऊन वाहन चालकांना रस्ते वाहतूक नियमांची माहिती करून देण्याबरोबरच अपघात होऊ नये यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!